Home /News /entertainment /

'साऊथमध्ये बॉलिवूड चित्रपटांना प्रेम का मिळत नाही?' सलमान खानच्या प्रश्नाचं राम चरणने दिलं असं उत्तर

'साऊथमध्ये बॉलिवूड चित्रपटांना प्रेम का मिळत नाही?' सलमान खानच्या प्रश्नाचं राम चरणने दिलं असं उत्तर

RRR या चित्रपटाने आमिर खानच्या (Aamir Khan) पीके आणि सलमान खानच्या (Salman Khan) बजरंगी भाईजानलासुद्धा पछाडलं आहे. परंतु साऊथ चित्रपटांना इकडे जितकं प्रेम मिळतं, तितकं साऊथमध्ये बॉलिवूड चित्रपटांना मिळत नाही.

    मुंबई, 12 एप्रिल-   Jr. NTR आणि राम चरण   (Ram Charan)   स्टारर 'RRR'ची सक्सेस पार्टी नुकतंच मुंबईत पार पडली. चित्रपटाच्या सर्व व्हर्जनने मिळून 1 हजार कोटींहून अधिक बॉक्स ऑफिस कमाई केली आहे. या आनंदात निर्मात्यांनी मुंबईत एक भव्य पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत टॉलिवूड आणि बॉलीवूडमधील अनेक मोठमोठे चित्रपट निर्माते, अभिनेते आणि दिग्दर्शकही उपस्थित होते. सोबतच सर्वात जास्त कमाई करणारा हा भारतातील तिसरा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने आमिर खानच्या  (Aamir Khan)  पीके आणि सलमान खानच्या   (Salman Khan)  बजरंगी भाईजानलासुद्धा पछाडलं आहे. परंतु साऊथ चित्रपटांना इकडे जितकं प्रेम मिळतं, तितकं साऊथमध्ये बॉलिवूड चित्रपटांना मिळत नाही. अलीकडेच साऊथ सुपरस्टार राम चरण यांनी एका प्रसिद्ध प्रकाशनाशी संवाद साधला. यादरम्यान त्याला विचारण्यात आलं की, बॉलिवूडच्या चित्रपटांचे साऊथमध्ये कौतुक का होत नाही? तर साऊथचे चित्रपट नॉर्थमध्ये का आवडतात?. या प्रश्नावर राम चरणने कोणताही आडफाटा न घेता उघडपणे प्रतिक्रिया दिली. RRR फेम अल्लुरी सीताराम राजू अर्थातच राम चरणने म्हटलं, 'मला हिंदी चित्रपटसृष्टीतील एका दिग्दर्शकाने पेन इंडिया चित्रपट बनवून दक्षिणेतही दाखवावा अशी माझी इच्छा आहे.' राम चरणने पुढं म्हटलं, सलमान खान यांनी ट्विट करत म्हटलंय, 'मला राम, राजामौली आणि तारक यांचं काम आवडतं. परंतु दक्षिण राज्यांमध्ये आमच्या चित्रपटांचं कौतुक का होत नाही? त्यांचा मुद्दा अगदी स्पष्ट आणि प्रामाणिक आहे. पण माझा विश्वास आहे की यात सलमानचा दोष नाही किंवा कोणत्याही चित्रपटाचा दोष नाही, 'आमचे चित्रपट तिकडेच पाहिले जाणार' किंवा 'तिकडेच पाहिले जाणार' ही स्क्रिप्ट आणि दिग्दर्शकाची विचारसरणी आहे... या सीमा ओलांडल्या पाहिजेत, आमचा चित्रपट सर्वत्र दिसेल'. चरण पुढे म्हणाला, 'मला नक्कीच एक असा भारतीय चित्रपट बनवायचा आहे जिथे मला बॉलिवूडमधील टॅलेंटसोबत काम करायचे आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकांनी साऊथमधील टॅलेंट शोधून मोठे चित्रपट बनवावेत. जेणेकरुन आपल्याकडे मोठे बजेट असेल आणि मग एके दिवशी आपल्याला येथेही प्रेक्षकांची चांगली संख्या पाहायला मिळेल अशी माझी इच्छा आहे'.खरं तर मार्चमध्ये आयोजित आयफा इव्हेंटच्या पत्रकार परिषदेदरम्यान सलमान खानने मीडियाशी बोलताना हा प्रश्न विचारला होता. आता राम चरणने याचं उत्तर दिलं आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Salman khan, South indian actor

    पुढील बातम्या