Amrish Puri Birth Anniversary: आमिर खाननं का केलं नाही अमरीश पुरींसोबत काम?

आमिर खाननं ‘त्या’ घटनेनंतर अमरीश पुरींसोबत कधीच केलं नाही काम

आमिर खाननं ‘त्या’ घटनेनंतर अमरीश पुरींसोबत कधीच केलं नाही काम

  • Share this:
    मुंबई 21 जून: अमरीश पुरी (Amrish Puri) हे बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जायचे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘नायक’, ‘मिस्टर इंडिया’, ‘करण अर्जून’ यांसारख्या कित्येक सुपरहिट चित्रपटांद्वारे जवळपास दोन दशक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. प्रामुख्यानं त्यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिका तुफान गाजल्या. त्यांनी बॉलवूडमधील जवळपास प्रत्येक सुपरस्टारसोबत काम केलं. अपवाद फक्त आमिर खान. (aamir khan) आमिर आणि त्यांच्यात अशी एक घटना घडली की ज्यानंतर दोघांनी कधीही एकत्र काम केलं नाही. आज अमरीश पुरी यांचा स्मृतीदिन आहे. (Amrish Puri Birth Anniversary) त्यानिमित्तानं जाणून घेऊया काय होती ती घटना... अक्षय कुमार बॉलिवूड पार्ट्यांना जाणं का टाळतो? सांगितलं चकित करणारे कारण बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि दिवंगत अभिनेते अमरीश पुरी हे दोन्ही कलाकार बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी आहेत. मात्र ‘जबरदस्त’ या चित्रपटानंतर या दोघांनीही एकमेकांसोबत काम करण्याचं कटाक्षाने टाळलं. 1985 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘जबरदस्त’ या चित्रपटातील एका सीनमुळे अमरीश पुरी आणि आमिर खान यांच्यामध्ये वाद झाले होते. या चित्रपटामध्ये अमरीश पुरी यांची मुख्य भूमिका होती. तर आमिर सहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेत होता. या चित्रपटातील एक सीन चित्रीत करत असताना अमरीश पुरी करत असलेलं काम आमिरच्या पसंतीत पडत नव्हतं. त्यामुळे याविषयी त्याने अमरीश यांना सांगितलं. परंतु त्यानंतर या दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. नंतर या दोघांनीही एकमेकांची माफी मागितली परंतु त्यानंतर हे दोघंही परत कधीच एकत्र दिसले नाहीत.
    Published by:Mandar Gurav
    First published: