Home /News /entertainment /

...म्हणून पहाटे 3 वाजता अमिताभ बच्चन करतात ट्वीट; KBC मध्ये केला खुलासा

...म्हणून पहाटे 3 वाजता अमिताभ बच्चन करतात ट्वीट; KBC मध्ये केला खुलासा

केबीसीच्या (KBC) हॉट सीटवर बसल्यावर स्पर्धेक तणावात असतात. त्यांचा तणाव दूर करण्यासाठी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) त्यांच्यांशी दिलखुलास संवाद साधतात.

    मुंबई, 23 डिसेंबर: कौन बनेगा करोडपती (KBC 12 ) या कार्यक्रमात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) स्पर्धकांशी संवाद साधत असतात. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये त्यांनी स्पर्धकांशी संवाद साधताना पहाटे 3 वाजता ते  ट्विटरवर (Twitter) वर का असतात याचं उत्तर दिलं आहे. या भागात त्यांनी गुजरातमधील निपी रावत या स्पर्धकाशी बोलताना सोशल मीडियाच्या वापरासंबंधी चर्चा केली. यावेळी त्यांनी याचं उत्तर दिलं. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर(Social Media) चांगले ॲक्टिव्ह असतात. ट्विटरवर त्यांचे करोडो फॉलोअर्स असून प्रत्येक ट्वीटला ते नंबरदेखील देत असतात. केबीसीच्या एका भागात निपी रावत (Nipi Rawat) स्पर्धक हॉट सीटवर होत्या. यावेळी त्यांनी एका प्रश्नामध्ये सोशल मीडियाचा उल्लेख होता. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) या कार्यक्रमात स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊन त्यांना रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी स्पर्धकाने अमिताभ यांना तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून तुम्हाला ट्विटरवर वेळ कसा मिळतो असे विचारले असता बच्चन यांनी याचे उत्तरं दिले. त्याचबरोबर ट्विटर वापरणे इतके सोपं नसल्याचंदेखील म्हटले. "अनेकदा शुटिंगवरून येण्यास उशीर होतो. त्यावेळी गाडीमध्ये मी ट्वीट करतो असे अमिताभ यांनी सांगितले. घरापासून शूटिंगच्या ठिकाणी जायला तास दीड तास इतका वेळ लागतो. रात्रीच्या वेळी ट्राफिक जास्त असल्याने 2 तास लागतात." याच वेळेत गाडीमध्ये ट्विटर आणि सोशल मीडियाचा वापर करतो असे त्यांनी सांगितले. परंतु अनेकदा तुम्ही रात्री 3 वाजता देखील ट्विट करता असे निपी यांनी विचारले असता याचे देखील उत्तर त्यांनी दिले. त्याचबरोबर निपी (Nipi Rawat) यांना देखील सोशल मीडियाचा वापर करता का? असा प्रश्न विचारला. यावर त्यांनी मी तुम्हाला सोशल मीडियावर फॉलो करत असून रात्री 3 वाजतादेखील तुमच्या पोस्ट पहिल्या असल्याचं सांगितलं. त्यावर बोलताना उशिरा शूटिंग करून घरी आल्यानंतर अंघोळ करून आणि जेवण करून आणि ऑफिसचे काम करून रात्री सोशल मीडिया वापरतो असे बच्चन यांनी सांगितले. त्यावर निपी यांनी केवळ आम्हीच नाही तर तुम्ही देखील चार वाजेपर्यंत जागता असे म्हटलं. यावर बच्चन यांनी त्यांचे रात्री ट्विट करण्याचे काही अनुभव देखील यावेळी शेअर केले. या अनुभवांविषयी सांगताना त्यांनी अनेकदा रात्री ट्वीट केल्यानंतर अनेकजण कमेंट करतात. इतक्या रात्री का जागे आहात असे म्हणत काहीजण रागावतात देखील. तर काहीजण शिव्यादेखील देतात असं बच्चन यांनी सांगितलं. ‘म्हाताऱ्या झोप आता खूप रात्र झाली आहे,’ असं म्हणत शिव्या देत असल्याचं देखील बच्चन यांनी यावेळी सांगितलं. अभिनेत्याचे आयुष्य खूप अवघड असल्याचं यामधून तुमच्या लक्षात येईल. दरम्यान, या भागात निपी (Nipi Rawat) यांनी 25 लाख रुपये जिंकत एका प्रश्नाचे उत्तर न आल्यानं खेळ सोडला. खरेतर या कार्यक्रमाच्या हॉट सीटवर बसल्यानंतर स्पर्धक तणावामध्ये असतात. परंतु  अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आपल्या खास शैलीत त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करतात.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Amitabh Bachchan, KBC

    पुढील बातम्या