मुंबई, 08 जानेवारी : राजद्रोहाचा खटला दाखल झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौत (kangana ranaut) आणि तिची बहिणी रंगोली चंदेलनं (rangoli chandel) अखेर वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये (Bandra police station) आपला जबाब नोंदवला आहे. यावेळी तिनं 'माझ्या ट्वीटमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील असं मला वाटतं नाही' असं उत्तर पोलिसांना दिलं. शिवाय हा जबाब नोंदवण्यापूर्वी तिनं एक व्हिडीओही ट्वीट केला होता. ज्यात तिनं आपलं शोषण केलं जात असल्याचा आरोप केला आहे.
राजद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणे अशा स्वरुपाचे गुन्हे वांद्रे पोलिसांनी कंगना विरोधात दाखल केले आहेत. कंगना म्हणाली, "माझं मानसिक, भावनिक आणि आता शारीरिक शोषणही का केलं जातं आहे? मला देशाकडून उत्तर हवं आहे. मी तुमच्यासाठी उभी राहिली होती. आता तुम्ही माझ्यासाठी उभे राहा. जय हिंद"
Why am I being mentally, emotionally and now physically tortured? I need answers from this nation.... I stood for you it’s time you stand for me ...Jai Hind 🙏 pic.twitter.com/qqpojZWfCx
कंगणा रणौत आणि तिची बहिण रंगोली चंदेल या दोघींनी आपला जबाब वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये नोंदवला आहे. जवळपास 2 तास दोघींची पोलिसांनी चौकशी केली. या दरम्यान पोलीस स्टेशनमध्ये जबाब देताना “आपण केलेले ट्वीट काही गैर नाही, ट्विटर हे एक सोशल मीडिया प्लेटफॉर्म आहे, त्यामुळे तिथे अनेक ट्विट केले जातात माझ्या ट्वीटमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, असं मला वाटत नाही' असं उत्तर तिने पोलिसांना दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
काय आहे प्रकरण ?
कंगना आणि तिची बहिण रंगोली या दोघांनी अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू नंतर मोठ्या प्रमाणात ट्वीट केले होते. यापैकी एका ट्विटवर आक्षेप घेत साहिल नावाच्या एका व्यक्तीने वांद्रे न्यायालयात कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होवून न्यायालयाने कंगना विरोधात राजद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणे या कलमांखाली गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार, वांद्रे पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणीच्या विरोधात गुन्हा नोंदवून दोघींना चौकशी करता तसंच जबाब नोंदवण्याकरता हजर राहण्याची नोटीस धाडली होती. पण कधी नातेवाईकांच्या लग्नाचे तर कधी कोविड -19 चे कारण देत कंगणा पोलीस स्टेशनच्या नोटीसीला केराची टोपली दाखवली होती. 3 ते 4 वेळा नोटीस पाठवूनही कंगनाने याकडे दुर्लक्ष केले होते. थेट या गुन्ह्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. मुंबई उच्च न्यायालयाने आज कंगना आणि तिच्या बहिणीला चौकशी करता हजर राहण्याचे आदेश दिले होते.