का बरं केलं अक्षयने टक्कल?

का बरं केलं अक्षयने टक्कल?

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याच्या टक्कलमुळे चांगलाच चर्चेत आहे. कारण या ग्लॅमरच्या दुनियेत एखाद्या अभिनेत्यानं असं फिरणं म्हणजे स्टंटपेक्षा कमी नाही.

  • Share this:

17 जानेवारी : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याच्या टक्कलमुळे चांगलाच चर्चेत आहे. कारण या ग्लॅमरच्या दुनियेत एखाद्या अभिनेत्यानं असं फिरणं म्हणजे स्टंटपेक्षा कमी नाही. त्यामुळे अक्षयने टक्कल का केलं? असा सवाल त्याच्या चाहत्यांनाही सतावत आहे.

आता अभिनेता म्हटलं की अफवा या आल्याच. अफ्रिकेत हेअर ट्रांन्सप्लांट करण्यासाठी अक्षयनं टक्कल केलं असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण एका टीव्ही शो दरम्यान अक्षयने टक्कल का केलं असल्याचं कारण सांगितलं आहे.

तर ते कारण असं की, अक्षय सध्या त्याच्या आगमी सिनेमाच्या तयारीत आहे. त्याने त्याच्या आगमी सिनेमासाठी टक्कल केलं आहे. या सिनेमात त्याला डोक्यावर मोठी पगडी बांधायची आहे म्हणून त्याने हा टक्कल केल्याचं अक्षयने स्पष्ट केलं. ते काहीही असो तो त्याच्या या लूकमध्येही भारी दिसतो हे नक्की.

First published: January 17, 2018, 2:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading