अक्षय कुमार बॉलिवूड पार्ट्यांना जाणं का टाळतो? सांगितलं चकित करणारे कारण

बॉलिवूडमध्ये काही कलाकार असे आहेत जे अशा झगमगाटापासून दूर असतात. त्यापैकीच एक आहे बॉलिवूड स्टार अक्षयकुमार (Akshay kumar)

बॉलिवूडमध्ये काही कलाकार असे आहेत जे अशा झगमगाटापासून दूर असतात. त्यापैकीच एक आहे बॉलिवूड स्टार अक्षयकुमार (Akshay kumar)

 • Share this:
  मुंबई 21 जून : देशातील हिंदी चित्रपटसृष्टी अर्थात बॉलिवूडबद्दल (Bollywood) लोकांना प्रचंड उत्सुकता असते. बॉलिवूड स्टार्सचं झगमगाटी आयुष्य, अलिशान राहणीमान याबद्दल विलक्षण कुतूहल असतं. बॉलिवूड पार्ट्या, पुरस्कार सोहळे, सेलिब्रेशन्स याबद्दल सतत चर्चा होत असते. पार्ट्यामध्ये झालेले वादविवाद, स्टार्सचं वर्तन अशा अनेक गोष्टी चाहत्यांमध्ये चर्चेचे विषय असतात. मात्र बॉलिवूडमध्ये काही कलाकार असे आहेत जे अशा झगमगाटापासून दूर असतात. त्यापैकीच एक आहे बॉलिवूड स्टार अक्षयकुमार (Akshay kumar). मार्शल आर्ट एक्स्पर्ट असणारा हा खिलाडी अक्षयकुमार एका वर्षात अनेक चित्रपट साईन करण्यासाठी प्रसिद्ध आहे. काही बाबतीत मात्र तो इतर कलाकारांपेक्षा वेगळा आहे. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे तो कधीही बॉलिवूड पार्ट्यांना (Bollywood Party) जात नाही. त्यामागचं नेमकं कारण काय याची चर्चा सतत होत असते. अनेकदा त्यानं स्वतः याचा उलगडा केला आहे. याच बाबतीतला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आहे कपिल शर्मा कॉमेडी शोचा (Kapil Sharma Comedy Show). या शोमध्ये आपल्या एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेला असताना अक्षयकुमारनं हे कारण स्पष्ट केलं होतं. ‘फास्ट अँड द फ्युरियस’मधील गाड्यांचा लिलाव; अभिनेत्याच्या स्पर्शामुळं 4 कोटींना विकली अक्षयकुमारसह कीर्ती कुल्हारी, सोनाक्षी सिन्हा आणि तापसी पन्नूही या शोमध्ये हजर होते. यावेळी कपिल शर्मा यानं अक्षयकुमारला प्रश्न विचारला आहे की, तुम्हालाही पार्टी द्यावी लागेल, म्हणून तुम्ही पार्ट्यांना जात नाही हे खरं आहे का ? त्यावेळी अक्षयकुमारनं तत्काळ उत्तर दिलं की, हो ! हे खरं आहे. त्याबरोबर सेटवर जोरदार हशा पिकला होता. कोण दिसतं अधिक सुंदर आई की लेक? पलक तिवारीचे बोल्ड फोटो पाहून चाहते बुचकळ्यात
  View this post on Instagram

  A post shared by Akshy Godara (@akshygodara)

  याआधीही अक्षयकुमारनं आपल्या बॉलिवूड पार्ट्यामध्ये न जाण्याचं कारण सांगितलं होतं. करण जोहरच्या शोमध्येही (Karan Johar Show) त्यानं याचा उलगडा केला होता. त्यानं सांगितलं होतं की, मला माझी झोप (Sleep) अतिप्रिय आहे आणि मला सकाळ (Morning) बघायला आवडते. जे लोक मला पार्टीला बोलावतात त्यांना माहित आहे की मी लवकर निघून जाणार ते. मला नाईट शिफ्ट बिलकूल आवडत नाही, असंही अक्षयकुमारनं सांगितलं होतं. अक्षयकुमार यंदा अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो रक्षाबंधन, बच्चन पांडे, पृथ्वीराज, राम सेतू या चित्रपटांमध्ये काम करत आहे. तर त्याचा बेलबॉटम हा चित्रपट 27 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published: