...म्हणून ऐश्वर्या-अभिषेकने थाटला नाही वेगळा संसार; अमिताभ-जया बच्चन यांच्यासोबतच राहतात

...म्हणून ऐश्वर्या-अभिषेकने थाटला नाही वेगळा संसार; अमिताभ-जया बच्चन यांच्यासोबतच राहतात

अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek bachchan) आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya rai bachchan) यांच्या लग्नाला 14 वर्षे झालीत. तरी ते एकत्र कुटुंबात राहतात.

  • Share this:

मुंबई, 20 एप्रिल :  सेलिब्रिटी काय अगदी आपल्यासारखी सर्वसामान्य माणसंही लग्न झाल्यानंतर आईवडिलांपासून वेगळी होऊन आपला वेगळा संसार थाटतात. मात्र अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek bachchan) आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya rai bachchan) मात्र अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) आणि जया बच्चन (Jaya bachchan) यांच्यासोबतच राहतात. वेगवेगळे बंगले असूनही आपल्या कुटुंबापासून ते लग्नानंतर वेगळे झाले नाहीत. याचं नेमकं कारण काय आहे?

आपण एकत्र कुटुंबात काय राहतो, याबाबत ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांनी मोठा खुलासा केला होता. ऑप्रा विनफ्रेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याचं कारण सांगितलं होतं. आज ऐश आणि अभिषेकच्या लग्नाचा 14 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने ती मुलाखत पुन्हा चर्चेत आली आहे.

हे वाचा - मंगळ होता म्हणून ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनआधी खरंच पिंपळाशी लग्न केलं होतं?

तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत एकत्र, एकाच घरात राहता हे कसं शक्य होतं? असा प्रशन ऑप्राने विचारला. त्यावेळी ऐश्वर्या या प्रश्नावर  अभिषेकच्या उत्तराची वाट पाहत होती. क्षणाचाही विलंब न करता अभिषेकनं उत्तर देण्याऐवजी ऑप्रालाच प्रश्न विचारला. त्यामुळे प्रेक्षकच नव्हे तर ऐश्वर्याही थक्क झाली. अभिषेकनं ऑप्रालाच विचारलं, तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत राहता का? कसं शक्य होतं?. आपल्या नवऱ्याच्या उत्तराबद्दल ऐश्वर्याला अतिशय अभिमान वाटला. त्यानंतर ‘आमच्यासाठी हे नैसर्गिक आणि सर्वसामान्य आहे’, असं उत्तर ऐश्वर्यानं दिलं होतं. अभिषेक पुढे म्हणाला, ‘माझे वडील त्यांच्या आई-वडिलांसोबतच राहात होते. मी माझ्या आई-वडिलांसोबत राहतो.’

हे वाचा - बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी काय करावं? रणवीर सिंगनं दिला कानमंत्र

‘एकत्र म्हणजे तुम्ही सगळे जेवण एकत्र करता की तुम्ही एका कोपऱ्यात असता आणि आई-वडील दुसऱ्या?, असा प्रश्न ऑप्राने यावर विचारला. त्यावेळी अभिषेक म्हणाला, आम्ही एकाच शहरात असलो,त र दिवसातील एका वेळचं जेवण तरी सर्वांनी एकत्र घेतलं पाहिजे, असा माझ्या आईचा नियम आहे.

First published: April 20, 2021, 10:01 PM IST

ताज्या बातम्या