Home /News /entertainment /

Deepika Padukone सोबत Viral झाला या चिमुकलीचा फोटो; ही मुलगी आहे तरी कोण?

Deepika Padukone सोबत Viral झाला या चिमुकलीचा फोटो; ही मुलगी आहे तरी कोण?

सध्या सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड चर्चेत आहे. आणि तो फोटो आहे अभिनेत्री दीपिका पादुकोणचा. या अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते हे खरं आहे. परंतु हा फोटो थोडा खास आहे.

  मुंबई, 29 डिसेंबर-  सध्या बॉलिवूड   (Bollywood)   कलाकरांप्रमाणे त्यांची लहान मुलंसुद्धा   (Starkids)  चर्चेत असतात. ही लहान मुलं आत्तापासूनच सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतात. त्यांचे फॉलोअर्ससुद्धा प्रचंड असतात. हे स्टारकिड्स सतत कोणत्या न कोणत्या कारणाने सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. परंतु काही स्टारकिड्स असे आहेत जी अजूनही कॅमेरापासून दूर आहेत. किंवा त्यांना कोणीही पाहिलेलं नाही. असच काहीसं आहे या फोटोतील चिमुकलीच्या बाबतीत. अभिनेत्री दीपिका पादुकोणचा   (Deepika Padukone)  एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ती एका गोंडस मुलीसोबत दिसून येत आहे. हा फोटो पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे ही चिमुकली नेमकी कोण? आज आपण तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. सध्या सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड चर्चेत आहे. आणि तो फोटो आहे अभिनेत्री दीपिका पादुकोणचा. या अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते हे खरं आहे. परंतु हा फोटो थोडा खास आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण एका गोंडस मुलीसोबत दिसून येत आहे. फोटोमध्ये दोघी फारच सुंदर दिसत आहेत. हा फोटो पाहून सर्वांना जाणून घ्याची उत्सुकता लागली आहे, की ही चिमुकली कोण आहे आणि ती दीपिकसोबत काय करतेय? तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, ही गोड मुलगी प्रसिद्ध गायक अदनान सामी यांची मुलगी आहे. अदनान सामी यांनी स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा सुंदर फोटो शेअर केला आहे. अदनान सामी  (Adnan Sami) यांनी फोटो शेअर करताच सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Adnan Sami (@adnansamiworld)

  अदनान सामी यांच्या या गोंडस मुलीचं नाव मेडिना सामी असं आहे. हा फोटो दीपिकाच्या नुकताच रिलीज झालेल्या '८३' चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यानचा आहे. यावेळी मेडिनासुद्धा आली होती. या चिमुकलीने पांढऱ्या रंगाचा सुंदर पोशाख परिधान केला होता. तर त्यावर निळ्या रंगाची सुंदर हॅटसुद्धा घातली होती. तर या प्रीमियरमध्ये दीपिका पादुकोण एकदम किलर लूकमध्ये दिसून आली होती. दीपिकाने यावेळी ऑफ शोल्डर ब्लॅक गाउन परिधान केला होता. त्याला स्पार्कल टच देण्यासाठी हिऱ्यांचा सुंदर नेकलेससुद्धा घातला होता. दीपिकाचा हा लूक पाहून सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. परंतु काही वेळेतच दीपिकाने हा पोशाख बदलत ब्लॅक शिमरी आणि ब्ल्यू डेनिम घातला होता. दीपिकाचे हे फोटो अजूनही सोशल मीडियावर चर्चेत आहेत. (हे वाचा:In Pics : 'Pushpa'च्या सक्सेस पार्टीत Rashmika Mandanna चा ग्लॅमरस लूक) या व्हायरल फोटोबद्दल सांगायचं झालं तर, गायक अदनान सामी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर करत लिहिलं आहे, 'जेव्हा तुम्ही हसता, तेव्हा संपूर्ण जग जग हसायला लागतं'. या फोटोमध्ये दीपिका एक सुंदर स्माईल देताना दिसून येत आहे. इतकंच नव्हे तर फोटमध्ये स्पष्ट दिसून येत आहे, की अदनान सामी यांची लेक मेडिना दीपिका पादुकोणसोबत फारच आनंदी दिसत आहे. हा फोटो समोर येताच चाहते दीपिकाचं कौतुक करत आहेत. तर अनेकांनी कमेंट्स करून या फोटोवरचं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. सर्वच युजर्सना मेडिना फारच भावली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Deepika padukone, Entertainment

  पुढील बातम्या