मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अशी झाली आहे ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीची अवस्था, ओळखणंही झालं कठीण

अशी झाली आहे ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीची अवस्था, ओळखणंही झालं कठीण

Radhika Apte

Radhika Apte

मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेचा(Radhika Apte) एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत तिला ओळखणंदेखील कठीण झाले आहे.

    नवी दिल्ली, 12 एप्रिल: अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) तिच्या अभिनयाइतकीच बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे. मोजक्याच चित्रपटांमध्ये अप्रतिम अभिनय करून राधिकानं बॉलिवूडमध्ये तिच स्थान निर्माण केलंय. राधिका चित्रपटांमध्ये तिच्या भूमिका अक्षरशः जगते, असं तिच्या चाहत्यांना वाटतं. राधिकाच्या अगदी सहज आणि उत्कृष्ट अभिनयामुळे तिचा वेगळा चाहतावर्ग आहे. राधिका सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. मात्र, अलीकडे तिचा एक फोटो व्हायरल झालाय. हा फोटो पाहून तुम्ही तिचा ओळखूच शकणार नाही.

    राधिका आपटेने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा लूक पूर्णपणे बदललेला दिसतोय. या फोटोत तिला ओळखणं खरंच कठीण आहे. यात राधिकाचे केस खूपच लहान आणि विखुरलेले दिसत आहेत. तिचे कपडेही मळलेले दिसत असून, चेहरा काळवंडलेला दिसतोय. कायम बोल्ड फोटो शेअर करणाऱ्या राधिकाचा हा थ्रोबॅक फोटो (Throw Back Photo) चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. तिच्या या फोटोनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

    View this post on Instagram

    A post shared by Radhika (@radhikaofficial)

    राधिकाचा हा फोटो आताचा नसून, जुना आहे. 2016 मध्ये आलेल्या 'पार्च्ड' (Parched) या चित्रपटाच्या शूटिंगवेळचा हा फोटो आहे. गुजरातमधील एका कथेवर बनलेल्या या चित्रपटात राधिकाने लज्जोची भूमिका साकारली होती. 'पार्च्ड' चित्रपटात राधिकाने आदिल हुसैनसोबत जबरदस्त इंटिमेट सीन दिले होते. या चित्रपटातील बोल्ड सीन्सची बरीच चर्चा झाली होती. राधिका आणि आदिलशिवाय सुरवीन चावला, लहर खान, तनिष्ठा चॅटर्जी, सयानी गुप्ता यांसारख्या कलाकारांनी या सिनेमात काम केलं होतं.

    PHOTOS: 'का रे दुरावा' फेम आदितीचं ग्लॅमरस फोटोशूट, आणि चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

    दरम्यान, राधिकाच्या अलीकडच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास विक्रांत मॅसी आणि राधिका आपटे स्टारर सायकोलॉजिकल थ्रिलर फॉरेन्सिक (Forensinc) चित्रपट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ZEE5 वर प्रीमियर होणार आहे. विशाल फुरिया दिग्दर्शित, हा त्याच नावाच्या 2020 मध्ये मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. मूळ चित्रपटात टोविनो थॉमस आणि ममता मोहनदास मुख्य भूमिकेत होते. हिंदी रिमेकमध्ये प्राची देसाई, बिंदू दारा सिंग आणि रोहित रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

    या चित्रपटाच्या माध्यमातून राधिका वर्षभराच्या ब्रेकनंतर पडद्यावर परतणार आहे. या चित्रपटात ती मसुरीच्या छोट्याशा शहरातील पोलीस अधिकारी मेघा शर्माची भूमिका साकारताना दिसणार आहे. राधिका ही मूळची पुण्याची असून तिने मराठी चित्रपटसृष्टीतही दर्जेदार चित्रपट केले आहेत. त्यामुळे तिच्या मराठी चाहत्यांनाही तिच्या नव्या चित्रपटांबाबत उत्सुकता असते. तिने हा जुना फोटो का शेअर केला याबद्दल मात्र आताच अंदाज बांधता येणार नाही. कदाचित तिच नवी पोस्ट टाकून त्याचा खुलासा करेल.

    First published:

    Tags: Bollywood actress, Entertainment, Marathi actress