मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'या' आहेत टीव्हीवरील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्री; पाहा List

'या' आहेत टीव्हीवरील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्री; पाहा List

मालिकेच्या माध्यमातून टीव्हीवरचे काही कलाकार बॉलीवूड कलाकारांच्या तोडीस तोड कमाई करत आहेत.

मालिकेच्या माध्यमातून टीव्हीवरचे काही कलाकार बॉलीवूड कलाकारांच्या तोडीस तोड कमाई करत आहेत.

मालिकेच्या माध्यमातून टीव्हीवरचे काही कलाकार बॉलीवूड कलाकारांच्या तोडीस तोड कमाई करत आहेत.

  मुंबई, 2ऑक्टोबर-  दिवसभराच्या ताण-तणावातून काही क्षण विरंगुळा मिळावा म्हणून अनेक जण टीव्ही पाहतात. टीआरपी मिळवण्यासाठी विविध वाहिन्यांवर सतत नवनवीन कार्यक्रम दाखवले जातात. यामध्ये डेली सोप (Daily Soap) आणि रिअॅलिटी शोp (Reality show) यांचा समावेश होतो. आजही अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात डेली सोप्स नियमित पाहिल्या जातात. त्यामुळे टीव्ही कलाकारांनादेखील अगदी बॉलिवूड सेलेब्रिटीजप्रमाणे लोकप्रियता मिळते. टीव्ही कलाकार मालिकेच्या प्रत्येक भागानुसार आपल्या कामाचा मोबदला आकारतात. छोट्या पडद्यावरच्या काही अभिनेत्रींचं मानधन लाखांच्या घरात आहे. मालिकेच्या माध्यमातून टीव्हीवरचे काही कलाकार बॉलीवूड कलाकारांच्या तोडीस तोड कमाई करत असल्याचं वृत्त 'दी सियासत डेली'नं दिलं आहे. सध्याच्या घडीला हीना खान ही सर्वांत जास्त कमाई करणारी टीव्ही अभिनेत्री आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, हीना खान मालिकेच्या एका भागासाठी दोन लाख रुपये मानधन घेते. हीना खानप्रमाणे इतर काही टीव्ही अभिनेत्रीही लाखाच्या घरात मानधन घेतात. सर्वांत जास्त मानधन घेणाऱ्या टॉप फाइव्ह अभिनेत्रींची माहिती घेऊ या.

निया शर्मा (Nia Sharma)

अभिनेत्री निया शर्मा सर्वांत लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रींपैकी एक असून, मानधनाच्या बाबतीत तिचा पाचवा क्रमांक लागतो. ग्लॅमरच्या बाबतीत तिने अनेक बॉलिवूड तारकांनादेखील मागे सोडलेलं आहे. मालिकेच्या एका भागाच्या चित्रिकरणासाठी निया 75 हजार ते 80 हजार रुपये मानधन घेते. तिने आतापर्यंत काली - एक अग्निपरीक्षा, एक हजारों में मेरी बहना है, जमाई राजा आणि इश्क में मरजावां, नागीन या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय 2017 मध्ये 'फीअर फॅक्टर : खतरों के खिलाडी' या रिअॅलिटो शोमध्येदेखील निया स्पर्धक म्हणून उतरली होती. 'ट्विस्टेड' नावाच्या वेब सीरिजमध्येही ती होती.

(हे वाचा:क्रिती सेननला झाली दुखापत:अभिनेत्रीला अशा अवस्थेत पाहून चाहते चिंतेत)

जेनिफर विंगेट (Jennifer Winget)

टीव्हीवरच्या सुंदर आणि निरागस चेहऱ्यांमध्ये अभिनेत्री जेनिफर विंगेटचा समावेश होतो. तिने आपल्या अष्टपैलू अभिनय कौशल्यामुळे मोठा चाहतावर्ग कमावला आहे. जेनिफर मालिकेच्या एका भागासाठी 1 लाख रुपये मानधन घेते. सर्वांत जास्त मानधन आकारण्याच्या बाबतीत तिचा चौथा क्रमांक लागतो. तिने वयाच्या बाराव्या वर्षी 'राजा को रानी से प्यार हो गया' या मालिकेतून बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिनं दिल मिल गये, सरस्वतीचंद्र, बेहद या मालिकांच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवली.

साक्षी तन्वर (Sakshi Tanwar)

22 वर्षांपूर्वी 'कहानी घर घर की' या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर आपली कारकीर्द सुरू करणारा साक्षी तन्वरदेखील एक लोकप्रिय चेहरा आहे. काही काळ ब्रेक घेतल्यानंतर साक्षीनं 'बडे अच्छे लगते है' या मालिकेतून पुनरागमन केलं. साक्षी एका भागाच्या चित्रीकरणासाठी 1 लाख 25 हजार रुपये म्हणजेच सव्वा लाख रुपये मानधन घेते. कमाईच्या बाबतीत साक्षीचा तिसरा क्रमांक लागतो.

(हे वाचा:अखेर समंथा आणि नागा चैतन्यने घेतला घटस्फोटचा निर्णय!अभिनेत्रीने केली इमोशन पोस्ट)

दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi)

आपला बहारदार अभिनय आणि मनमोहक हास्याच्या बळावर दिव्यांका त्रिपाठीनं चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. दिव्यांका मालिकेच्या एका भागासाठी एक ते दीड लाख रुपये मानधन घेते. सर्वांत जास्त मानधन घेण्याच्या बाबतीत तिचा दुसरा क्रमांक लागतो. दिव्यांकानं दूरदर्शनवरच्या कार्यक्रमातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. नंतर झी टीव्हीवरच्या 'बनू मैं तेरी दुल्हन' आणि स्टार प्लसच्या 'ये है मोहब्बतें' या मालिकांनी तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. तिने पती विवेक दहियासोबत 'नच बलिये' या डान्स शोच्या आठव्या सीझनमध्येदेखील सहभाग घेतला होता. दिव्यांकानं नुकतंच 'खतरों के खिलाडी'च्या अकराव्या सीझनचं उपविजेतेपद मिळवलं आहे.

हीना खान (Hina Khan)

स्टार प्लसवरच्या 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या हीना खाननं बॉलीवूड अभिनेत्रीप्रमाणे लोकप्रियता मिळवली आहे. हीना एका भागासाठी सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. एका भागासाठी ती दीड ते दोन लाख रुपये आकारते. अक्षराच्या पात्रानंतर तिचं 'कसोटी जिंदगी की'मधलं कमोलिकाचं पात्रदेखील गाजलं. हीनानं 2017 मध्ये 'बिग बॉस सिझन 11'मध्येही सहभाग घेतला होता आणि फर्स्ट रनर अप झाली होती. याशिवाय तिने 'खतरों के खिलाडी'च्या आठव्या सीझनमध्येही भाग घेतला होता. त्यात ती फर्स्ट रनर अप ठरली होती. टीव्ही व्यतिरिक्त हीना खाननं अनेक म्युझिक व्हिडिओदेखील केले आहेत.

First published:

Tags: Entertainment, Tv actress