मुंबई, 13 मे : बॉलिवूडमधील महत्त्वाच्या कुटुंबापैकी एक असलेल्या खान कुटुंबात आणखी एक घटस्फोट होतो आहे. अभिनेता सलमान खानच्या पहिला भाऊ
(Salman khan borther) अरबाज खानपाठोपाठ आता त्याचा दुसरा भाऊ सोहेल खानही घटस्फोट घेतो आहे
(Sohail khan Seema khan divorce). सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान दोघांनी मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. कोर्टाबाहेरी त्यांचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. अभिनेत्री मलायका अरोरापाठोपाठ सीमा खानही 24 वर्षांच्या संसारानंतर खान कुटुंबापासून विभक्त होते आहे. ही सीमा खान नेमकी आहे कोण? पाहुयात.
सोहेल आणि सीमाची पहिली भेट प्यार किया तो डरना क्याच्या शूटिंगवेळी झाली होती. त्यावेळी सीमा मुंबईत राहत होती. ती फॅशन डिझाइनिंगमध्ये आपलं करिअर बनवत होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आणि आयुष्यभऱ एकमेकांचं होण्याचा निर्णय घेतला. 1998 साली त्यांनी लग्न केलं.
सोहेल आणि सीमाचं लग्न होणं इतकं सोपं नव्हतं. सीमाच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. तेव्हा दोघांनी पळून लग्न केलं. त्यांचे काही नातेवाईक आणि जवळचे मित्रमैत्रिणी यांच्या उपस्थितीत त्यांनी सिक्रेट वेडिंग केल्याचं सांगितलं जातं. दोन वर्षांनंतर या दोघांचे तीन झाले. त्यांनी निरवान या आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला. 2011 साली दुसरा मुलगा योहानचा जन्म झाला. त्यानंतर सीमाच्या कुटुंबानेही त्यांच्या लग्नाचा स्वीकार केला.
हे वाचा - ....पण मला सून बनवा, 'या' मुलीने कार्तिक आर्यनच्या आईकडे केली होती अजब मागणी
सीमा खान आता एक फॅशन डिझाइनर आणि अभिनेत्री आहे. पण कधी काळी एकमेकांवर खूप प्रेम करणारे सोहेल-सीमा आता वेगळे का होत आहेत, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. या कपलने त्याबाबत काहीच अधिकृत माहिती दिलेली नाही. पण ते दोघं बऱ्याच कालावधीपासून एकत्र राहत नव्हते. 2017 सालीही त्यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली होती. सीमाने फॅब्युलस लाइव्हज ऑफ बॉलिवूड वाइफ (Fabulous Lives of Bollywood Wives) या शोमध्ये काही संकेतही दिले होते.
तिने सांगितलं होतं, "सोहेल आणि मी एका साचेबद्ध लग्नात नाहीत पण आम्ही एक कुटुंब आहोत. आम्ही एक आहोत, आमच्यासाठी, त्याच्या आणि माझ्यासाठी आणि आमच्या मुलांसाठी. ती आपल्या स्पेसमध्ये राहते. दोन्ही मुलांचं दोन्ही घरात येणं-जाणं असतं". दोघंही आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात. आपल्या मुलांसोबत ते सोशल मीडियावर फोटोही शेअर करतात.
हे वाचा - लता मंगेशकरांनी का केलं नाही लग्न? आता होणार खुलासा
अरबाज खान आणि मलायका अरोरा या दाम्पत्याच्या घटस्फोटाच्या काही वर्षांनंतरच सोहेल आणि सीमानेही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. अरबाज-मलायकाने 18 वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. 2016 मध्ये दोघंही एकमेकांपासून वेगळे झाले आणि मे 2017 साली त्यांनी घटस्फोट घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.