Elec-widget

बिग बींवर टीका करणाऱ्या सपनाचं धोनीसोबतचं कनेक्शन तुम्हाला माहीत आहे का?

बिग बींवर टीका करणाऱ्या सपनाचं धोनीसोबतचं कनेक्शन तुम्हाला माहीत आहे का?

धोनीने तिला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तो फक्त तिच्याकडे पाहत राहीला.

  • Share this:

मुंबई, १३ ऑक्टोबर : संपूर्ण देशभरात सध्या #METOO चे वारे वाहताना दिसत आहेत. लैंगिक शोषण केल्याप्रकरणी बॉलिवूडमधील अनेक नावाजलेल्या कलाकारांची नावं पुढे येत आहेत. नाना पाटेकर, अनु मलिक, आलोकनाथ, साजिद खान, विकास बहल, कैलाश खैर या कलाकरांचे नाव आतापर्यंत पुढे आले आहेत. तुर्तास या कलाकारांवर आरोप केले असले तरी आरोप सिद्ध झालेले नाहीत. मात्र झालेल्या आरोपांमुळे या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि कामावर बराच परिणाम झालेला आहे. या प्रकरणात आता चक्क बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांचं नावही समोर आलं आहे.

 

Loading...

View this post on Instagram

 

12 years. With one man. 💕@mahi7781 @madowothair #jebaat #tothemoonandback . . . . . . . . . #dhoni #sapnabhavnani #madowothair #madowotsalon #mumbai #mumbaidiaries #mumbai #msd #mumbai #captainsaab #pinkhair #shooting #adventure #cricket #socute #12yearanniversary #boytoman #journey #inspiration #bandra #sexy #smile #inkedgirls #inked #inkedlife #shootlife #ladybarber

A post shared by बम्बई की रानी (@sapnamotibhavnani) on

#metoo प्रकरणाबाबत आपले मत व्यक्त करताना महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ७६ व्या वाढदिवशी ट्विट करत लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या मोहिमेचं समर्थन केलं. त्या ट्विट विरोधात उत्तर देण्यासाठी हेअर स्टायलिस्ट सपनाने लिहिले की, ‘हे सगळं साफ खोटं आहे. सर तुमचा 'पिंक' सिनेमा येऊन गेला आणि त्यात तुम्ही साकारलेली एका कार्यकर्त्याची छबीही झाकोळली गेली. आता लवकरच तुमच्याबद्दलचं सत्य जगासमोर येईल. याक्षणी तुम्ही चिंतेत तुमची नखं चावण्यापेक्षा पूर्ण हातच चावत असाल. कारण तुम्हाला नखं तर अपुरीच पडणार.’ सपनाच्या या ट्वीटमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

सपना भावनानीचं क्रिकेटर धोनीसोबत काय संबंध?

सपना भावनानी ही महेंद्र सिंह धोनीची जवळची मैत्रीण आहे. धोनीने खेळात प्रवेश केल्यानंतर त्याच्या लूकमध्ये बदल करावं असं त्याला वाटलं. त्यानंतर धोनीच्या मॅनेजरने हेअर स्टाईलिस्ट सपनाला फोन करून तिला धोनीसाठी हेअर स्टाईल करण्याबद्दल सांगण्यात आलं. सपना आणि धोनीची पहिली भेट ताज हॉटेलमध्ये झाली. सपनाच्या म्हणण्यानुसार, धोनीने तिला पहिल्यांदा पाहिल्यावर तो फक्त तिच्याकडे पाहत राहीला. कारण त्याने याआधी संपूर्ण हातावर टॅटू असलेली बाई कधी पाहिली नव्हती. धोनी हा वेळेच्या बाबतीत खूप तटस्थ आहे आणि त्याचा स्वभाव खूप शांत आहे. धोनीसारख्या मित्रामुळे मला एक वेगळी ओळख मिळाली असं सपना भावनानीचं म्हणणं आहे.

कंगनाने केली उज्जैन येथील महाकाल मंदिरात आरती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2018 08:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...