मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

दीपिका आणि कतरिनामध्ये सर्वात सुंदर कोण आहे? रणबीरने चटकन घेतलेलं हे नाव

दीपिका आणि कतरिनामध्ये सर्वात सुंदर कोण आहे? रणबीरने चटकन घेतलेलं हे नाव

सगळयात सुंदर कोण आहे? दीपिका की कतरीना? यावर रणबीरने चटकन हे उत्तर दिलं होतं.

सगळयात सुंदर कोण आहे? दीपिका की कतरीना? यावर रणबीरने चटकन हे उत्तर दिलं होतं.

सगळयात सुंदर कोण आहे? दीपिका की कतरीना? यावर रणबीरने चटकन हे उत्तर दिलं होतं.

  • Published by:  News Digital

मुंबई 11 सप्टेंबर : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) मुलींमध्ये फारच प्रसिद्ध आहे. त्याची मोठी फिमेल फॅनफॉलोइंग आहे. आपल्या चार्मिंग पर्सनालिटीने त्याने सुरुवातीपासूनच चाहत्यांची मनं जिंकली आहेत. याशिवाय त्याची अनेक अभिनेत्रींशी नावंही जोडली गेली होती. त्यात सोनम कपूर ते कतरीना कैफ अनेकींची नावं सामील आहेत.

दीपिकालाही (Deepika Padukone) काही काळ रणबीर डेट करत होता. ती त्याच्याबद्दल फारच गंभीर देखील होती. मात्र त्यानंतर रणबीरच्या आयुष्यात अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आली. व रणबीरने कतरिनासाठी दीपिकाला सोडलं आणि त्यांचं ब्रेकअप झालं. या धोक्यानंतर दीपिका पूर्णपणे तुटली होती. त्यानंतर कतरिना आणि रणबीर एकमेकांना डेट करू लागले.

'देवमाणूस' फेम नेहा खानच्या घरी विराजमान झाले बाप्पा; अभिनेत्रीने केली अशी पूजा

रणबीर आणि कतरिनाची जोडी फारच प्रसिद्ध झाली होती. तब्बल 6 वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. त्याचं नात हे सर्वश्रुत झालं होतं. इतकंच नाही तर अनेकदा त्यांच्या लग्नाच्या बातम्याही आल्या होत्या. सलमान खानने एकदा एका कार्यक्रमादरम्यान कतरिनाला मिसेस कपूर म्हटलं होतं. तर कॉफी विथ करण कार्यक्रमात करीनाने (Kareena Kapoor) कतरिनाला वहिनी म्हणून स्वीकारलं होतं.

दरम्यान एकदा रणबीरने करण जोहरच्या कॉफी विथ करण (Koffee With Karan) कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी करणने रणबीरला अनेक प्रश्न विचारले होते. त्यातील रॅपिड फायरमध्ये करणने विचारलं की, सगळयात सुंदर कोण आहे? दीपिका की कतरीना?  यानंतर सुरूवातीला रणबीर थोडा गोंधळात पडला होता. पण त्यानंतर त्याने चटकन कतरिनाचं नाव घेतलं. रणबीरचा हा व्हिडीओ फारच व्हायरल झाला होता.

दरम्यान रणबीर त्यावेळी कतरिनाला डेट करत होता. ते दोघे 6 वर्षे एकमेकांना डेट करत होते. मात्र त्यानंतर त्याचं ब्रेकअप झालं. सध्या रणबीर अभिनेत्री आलिया भट्टला (Alia Bhatt) डेट करत आहे. तर गेली दोन वर्षे ते एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा ते एकत्र दिसतात तर आलियाने जाहीररित्या तिचं प्रेमही व्यक्त केलं आहे.

First published:

Tags: Deepika padukone, Entertainment, Katrina kaif, Ranbir kapoor