मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

The Kashmir Files चित्रपटावर सडकून टीका करणारे नादव लॅपिड आहेत तरी कोण? याआधीही केलीत अनेक वादग्रस्त वक्तव्य

The Kashmir Files चित्रपटावर सडकून टीका करणारे नादव लॅपिड आहेत तरी कोण? याआधीही केलीत अनेक वादग्रस्त वक्तव्य

 नादव लॅपिड

नादव लॅपिड

ज्युरी प्रमुख असलेल्या नादव यांनी ‘द काश्मीर फाइल्स’च्या इफ्फीमधील स्क्रीनिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.भारतीय चित्रपटावर सडकून टीका करणारे नादव लॅपिड कोण आहेत?

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 नोव्हेंबर :     विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट या वर्षातील (2022) सर्वांत वादग्रस्त चित्रपटांपैकी एक आहे. अनुपम खेर, मिथुन, दर्शन कुमार आणि पल्लवी जोशी यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 340 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपट रिलीज होऊन आठ महिने उलटले असले तरीही हा चित्रपट काहीना काही कारणास्तव चर्चेत येत आहे. इस्रायली दिग्दर्शक नादव लॅपिड यांनी गोव्यातील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या (इफ्फी) समारोपीय भाषणादरम्यान टीका केल्यानंतर 'द काश्मीर फाइल्स' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ज्युरी प्रमुख असलेल्या नादव यांनी ‘द काश्मीर फाइल्स’च्या इफ्फीमधील स्क्रीनिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. हा चित्रपट विचलित करणारा आणि अश्लील आहे, असं ते म्हणाले आहेत. भारतीय चित्रपटावर सडकून टीका करणारे नादव लॅपिड कोण आहेत? याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

कोण आहेत नादव लॅपिड?

इस्रायल येथील तेल-अविव शहरात 1975 मध्ये नादव लॅपिड यांचा जन्म झाला. त्यांनी तेल-अविव युनिव्हर्सिटीत फिलॉसॉफी आणि पॅरिसमध्ये साहित्याचा अभ्यास केला आहे. 2001 मध्ये, नादव यांनी 'कॉन्टिनुआ बालांदो' नावाची कादंबरी प्रकाशित केली. त्यांनी इस्रायलमधील अनेक माहितीपटांमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलं आहे. 2006 मध्ये त्यांनी जेरुसलेममधील सॅम स्पीगल फिल्म स्कूलमधून पदवी प्राप्त केली. 2011 लोकार्नो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'पोलिसमन' या त्यांच्या पहिल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाला विशेष ज्युरी पारितोषिक मिळालं.

हेही वाचा - Kashmir Files वर केलेल्या टीकेवर इस्राइल राजदूतांनी मागितली माफी; म्हणाले माणूस म्हणून मला...

2014 मध्ये कान्स फीचर फेस्टिव्हलच्या क्रिटिक्स वीक विभागात नादव याच्या 'द किंडरगार्टन टीचर' चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर झाला. 2016 मध्ये, त्यांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये क्रिटिक्स वीक विभागासाठी ज्युरी सदस्य म्हणून काम केलं. 2019 बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये नादव यांच्या 'सिनॉनिम्स' चित्रपटाला गोल्डन बेअर मिळालं.

2021 मध्ये, त्यांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील स्पर्धेसाठी 'अहेद्स नी' (Ahed’s Knee) हा चित्रपट पाठवला होता. सध्या नादव एका नवीन प्रोजेक्टवर काम करत आहेत. हा चित्रपट अहेद तामिनी या पॅलेस्टिनी किशोरवयीन तरुणाच्या आयुष्यावर आधारित आहे. या तरुणानं इस्त्रायली सैनिकाच्या तोंडात मारल्यामुळे त्याला 2017 मध्ये तुरुंगवास भोगावा लागला आहे.

दिग्दर्शक म्हणून नादव लॅपिडच्या फिल्मोग्राफीमध्ये ‘द स्टार’, ‘फ्रॉम द डायरी ऑफ वेडिंग फोटोग्राफर, व्हाय?’, ‘एमिलिझ फ्रेंड’, ‘रोड’ या शॉर्टफिल्मचा आणि अहेद्स नी, सिनॉनिम्स, लव्ह लेटर टू सिनेमा, द किंडरगार्टन टीचर, पोलीस या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी, फुटस्टेप्स इन जेरुसलेम, गाझा सेडरॉट: लाइफ इन स्पीट ऑफ एव्हरीथिंग या माहितपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांनी 'बॉर्डर प्रोजेक्ट' नावाची एक डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मही तयार केलेली आहे.

हेही वाचा - Kashmir Filesला प्रपोगंडा आणि वल्गर म्हणणाऱ्या नादेव वर भडकले अनुपम खेर

 इफ्फीशी नादव लॅपिड यांचा संबंध काय?

नादव आणि इफ्फी यांचा फार जुना संबंध आहे. 2014मध्ये नादव यांनी दिग्दर्शित केलेल्या 'द किंडरगार्टन टीचर' या चित्रपटातील सरित लॅरी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. 2016 मध्ये, नादव यांची इफ्फीमधील आंतरराष्ट्रीय समीक्षक सप्ताह विभागात ज्युरी म्हणून निवड झालेली आहे.

या वर्षीच्या इफ्फीमध्ये काय घडलं?

ज्युरी प्रमुख असलेल्या नादव यांनी ‘द काश्मीर फाइल्स’च्या इफ्फीमधील स्क्रीनिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ते म्हणाले, "इफ्फीमधील 15वा चित्रपट 'द काश्मीर फाइल्स'मुळे ज्युरी व्यथित झाले आहेत. प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवातील कलात्मक स्पर्धात्मक विभागात हा चित्रपट दाखवल्यामुळे ज्युरींना धक्का बसला आहे. हा चित्रपट अप्रचार करणारा आणि अश्लील आहे."

नादव लॅपिड आणि इतर वाद

47 वर्षीय नादव लॅपिड हे त्यांच्या मातृभूमीशी असलेल्या 'लव्ह-हेट रिलेशनशीप'साठी ओळखले जातात. शोमरॉन (सामारिया/वेस्ट बँक) फिल्म फंड लाँच केल्याच्या निषेधार्थ लिहिल्या गेलेल्या खुल्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या 250 इस्रायली चित्रपट निर्मात्यांच्या गटात नादवही होते.

आपल्या 'सिनॉनिम्स' या चित्रपटाबद्दल बोलताना त्यांनी इस्त्रायलबद्दल वादग्रस्त वक्तव्यं केली होती. नादव म्हणाले होते की, 'इस्रायली समुदाय हा एखाद्या भटक्या आत्म्यासारखा आहे. इस्रायलच्या अस्तित्वामध्ये काहीतरी खोटेपणा आहे. एखाद्या कुजलेल्या वस्तूप्रमाणं इस्त्रायलची अवस्था आहे. फक्त राष्ट्रपती बेंजामिन नेतन्याहूच नाही तर इस्रायलमधील तरुणांसाठीदेखील हे लागू होतं. बळकट आणि सतत हसतमुख दिसणारे इस्रायली तरुण कोणतेही प्रश्न उपस्थित करत नाहीत. त्यांना इस्रायली असल्याचा प्रचंड अभिमान आहे. त्यांच्याकडे अस्तित्वाची, आम्ही विरुद्ध इतर सर्व अशी द्विविज्ञानी (dichotomist ) दृष्टी आहे'.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News