Home /News /entertainment /

वयात 10 वर्षांचं अंतर, लग्न न करताच 12 वर्षांचा संसार, दोन मुलं अन् आता विभक्त! कशी होती शकीरा-जेरार्डची Love स्टोरी

वयात 10 वर्षांचं अंतर, लग्न न करताच 12 वर्षांचा संसार, दोन मुलं अन् आता विभक्त! कशी होती शकीरा-जेरार्डची Love स्टोरी

स्पॅनिश फुटबॉल गेरार्ड पिक (footballer gerard pique) आणि पॉप स्टार शकीरा (pop singer shakira) यांची पहिली भेट 2010 FIFA विश्वचषकाच्या थीम साँगच्या शूटिंग दरम्यान झाली होती. शकीरा गेरार्डपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. विशेष म्हणजे या जोडप्याचा वाढदिवस एकाच दिवशी येतो.

पुढे वाचा ...
    मुंबई, 5 जून : तुम्हाला 2010 चा फुटबॉलचा फिफा वर्ल्डकप (2010 FIFA World cup) आठवत असेल तर वाका-वाका हे गाणंही आठवत असेल. या गाण्यानं जगभरात धुमाकूळ घातला होता. ज्याला फुटबॉलची माहिती नाही, त्यालाही या गाण्यानं वेड लावलं होतं. या गाण्याची निर्मिती करणारी स्टार पॉप सिंगर शकीरा (pop singer shakira) आणि स्पेनचा स्टार फुटबॉलपटू गेरार्ड पिक (footballer gerard pique) वेगळे झाले आहेत. 2010 च्या फिफा विश्वचषकादरम्यान दोघांची पहिली भेट झाली होती. शकीरा आणि गेरार्डने वाका-वाका हे गाणे शूट केले. त्यांचे नाते 12 वर्षांहून अधिक काळ टिकले आहे. पण, गेरार्डच्या धोक्यामुळे सर्व संपुष्टात आले आहे. या जोडप्याच्या भेटीची कहाणी खूपच रंजक आहे. गेरार्ड आणि शकीरच्या नात्याची सुरुवात एका मूर्ख प्रश्नाने झाली, जी स्वत: शकीराने उघड केली. विश्वचषकादरम्यान दक्षिण आफ्रिकेत पोहोचण्यापूर्वी गेरार्डने शकीराला फोनवर विचारले होते, तेथील हवामान कसे आहे? या प्रश्नावरून दोघांमध्ये संवाद सुरू झाला. या जोडप्यात सर्वात सामान्य गोष्ट म्हणजे त्यांचा वाढदिवस. दोघांचा वाढदिवस 2 फेब्रुवारीलाच येतो. जरी शकीरा गेरार्डपेक्षा 10 वर्षांनी मोठी असली तरी, त्यांच्यातील प्रेमाने वयातील अंतर देखील भरून काढलं होतं. शकीराचा जन्म कोलंबियामध्ये 1977 मध्ये झाला होता, तर गेरार्डचा जन्म 1987 मध्ये बार्सिलोना, स्पेनमध्ये झाला होता. वाका - वाकाच्या शूटिंगदरम्यान भेट झाली 2010 च्या फिफा विश्वचषकाचे अधिकृत गाणे वाका-वाका या गाण्याच्या शूटिंगदरम्यान शकीरा आणि गेरार्ड यांची पहिली भेट झाली होती. शकीराने हे गाणे गायले आणि त्यावर परफॉर्मही केले. गेरार्ड देखील या व्हिडिओचा एक भाग होता. वाका वाका या गाण्याच्या व्हिडिओमध्ये स्पॅनिश फुटबॉलपटू गेरार्ड 1 मिनिट 10 सेकंदात दिसत होता. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या फिफा विश्वचषकात गेरार्डने स्पेनला विश्वविजेता बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. शकीरा आणि गेरार्ड यांना दोन मुले आहेत, जरी दोघेही विवाहित नसले तरी. निरर्थक प्रश्नाने सुरुवात एका मुलाखतीत शकीराने सांगितले की, ती कधीच फुटबॉलची चाहती नव्हती. या कारणास्तव, ती त्यावेळी गेरार्डला ओळखू शकली नाही. मात्र, त्या गाण्याचा व्हिडिओ पाहिल्यावर तिची नजर गेरार्डवर खिळली आणि तिला तो खूप प्रिय वाटला. यानंतर कोणीतरी त्यांची ओळख करून देण्याचे ठरवले. त्याचवेळी गेरार्डच्या म्हणण्यानुसार या दोघांची प्रेमकहाणी दक्षिण आफ्रिकेत फुलू लागली. वास्तविक, शकीरा त्या विश्वचषकाच्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करणार होती, त्यामुळे ती आधीच दक्षिण आफ्रिकेत होती. या कारणास्तव गेरार्डने तिला मॅसेज केला. परम सुंदरीनं दिमाखात पटकवलं अवॉर्ड, IIFAमध्ये वाजला मराठीचा डंका अन् प्रेम फुलू लागलं गेरार्डने तिला तेथील हवामानाबद्दल विचारले आणि तो त्याला अतिशय मूर्खपणाचा प्रश्न वाटला. या प्रश्नाच्या उत्तरात शकीराने त्याला सोबत एक जॅकेट आणायला सांगितले (दक्षिण आफ्रिकेत जून-जुलैमध्ये थंडी असते), पण त्यानंतर शकीराने त्याला दर मिनिटाला हवामानाबद्दल सांगायला सुरुवात केली. एका मुलाखतीत, गेरार्डने सांगितले की, या वेळी त्याला तो मुद्दा मिळाला जिथे त्याने शकीराला सांगितले की तिला परत पाहण्यासाठी तो विश्वचषक जिंकेल. वास्तविक शकीरा फायनल सामन्यात सादरीकरण करणार होती. यानंतर दोघांमध्ये बोलणं वाढत गेलं. मात्र, 2011 मध्ये या जोडप्याने ऑगस्ट 2010 मध्ये वेगळे झाल्याचे निवेदन जारी केले होते. पण या वक्तव्यानंतर अवघ्या महिन्याभरातच दोघेही बार्सिलोनातील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले. 2012 मध्ये हे कपल पहिल्यांदा रेड कार्पेटवर एकत्र आले होते. शकीरा स्वित्झर्लंडमधील FIFA Ballon d'Or gala मध्ये गेरार्डसोबत सहभागी झाली होती आणि काही महिन्यांनंतर, शकीराने पुष्टी केली की ती आणि गेरार्ड आई-वडिलांची होणार आहेत. गेरार्ड कोण आहे? 35 वर्षीय गेरार्ड हा स्पेन फुटबॉल संघाचा बचावपटू (डिफेंडर) राहिला आहे. तो मध्यभागी खेळतो. गेरार्ड त्याच्या घरच्या फुटबॉल क्लब बार्सिलोना कडून खेळतो. गेल्या वर्षीपर्यंत लिओनेल मेस्सीही या क्लबकडून खेळायचा. 2010 चा फिफा विश्वचषक जेव्हा स्पेनने जिंकला तेव्हा गेरार्डही संघाचा महत्त्वाचा भाग होता आणि त्यानेही चमकदार कामगिरी केली होती. गेरार्डने वर्षभरापूर्वी म्हणजेच 2009 मध्ये पदार्पण केले होते. Deepak Chahar Marriage : 'हनीमूनला पाठीकडे लक्ष दे, वर्ल्ड कप तोंडावर', बहिणीच्या सल्ल्याने दीपक चहर क्लीन बोल्ड! गेरार्डने बार्सिलोनासाठी स्पॅनिश फुटबॉल लीग 'ला लीगा' 8 वेळा जिंकली आहे. त्याने 4 वेळा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपदही जिंकले आहे. गेरार्डने तीन वेळा क्लब विश्वचषकही जिंकला आहे. 2021 मध्ये युरो कप जिंकणाऱ्या संघात गेरार्डने महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2004 ते 2008 या काळात गेरार्ड हा इंग्लंडच्या मँचेस्टर युनायटेड क्लबचाही एक भाग होता. गेरार्डच्या कारकिर्दीचा विक्रम गेरार्ड पिकने त्याच्या क्लब फुटबॉल कारकिर्दीत एकूण 655 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 58 गोल केले आहेत. गेरार्डनेही 14 गोलांना मदत केली आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत गेरार्डने स्पेन संघासाठी 103 सामने खेळले, त्यात 5 गोल केले. गेरार्ड हाही मोठा उद्योगपती गेरार्ड पिक हे फुटबॉल क्षेत्राबाहेरील मोठे उद्योगपतीही आहेत. या स्पॅनिश स्टारने 5 वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 मध्ये कॉसमॉस नावाची कंपनी सुरू केली होती. ते या कंपनीचे सीईओही आहेत. लिओनेल मेस्सीनेही या कंपनीत पैसे गुंतवले आहेत. गेरार्डची कंपनी कॉसमॉसने टेनिस फेडरेशनसोबत 3 अब्ज डॉलरची भागीदारीही केली आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Football

    पुढील बातम्या