S M L

कोण आहे मराठी बिग बाॅसमध्ये 16वा स्पर्धक?

या बोर्डवर बिग बॉस रहिवासी संघ असं लिहिण्यात आलं असून 15 स्पर्धकांची नावं लिहिण्यात आलीयत.मात्र या बोर्डवर 16 नंबर लिहिलाय. मात्र त्यावर कुणाचंही नाव लिहिण्यात आलेलं नाही.

Sonali Deshpande | Updated On: Apr 17, 2018 03:59 PM IST

कोण आहे मराठी बिग बाॅसमध्ये 16वा स्पर्धक?

17 एप्रिल : मराठी बिग बॉसला मोठ्या धडाक्यात सुरुवात झालीये आणि 15 स्पर्धक बिग बॉसच्या घरात रहाण्यासाठी दाखल झालेत हे तर आता आपल्या सगळ्यांनाच माहितीये. मात्र सगळे स्पर्धक घरात दाखल झाल्यानंतर या घराच्या एका कोपऱ्यात एक खास बोर्ड लावण्यात आलाय. या बोर्डवर बिग बॉस रहिवासी संघ असं लिहिण्यात आलं असून 15 स्पर्धकांची नावं लिहिण्यात आलीयत.

मात्र या बोर्डवर 16 नंबर लिहिलाय. मात्र त्यावर कुणाचंही नाव लिहिण्यात आलेलं नाही. आता हा 16 वा स्पर्धक म्हणजे वाईल्ड कार्ड एंट्री ठरते का ते पहायचं.

'मराठी बिग बॉस'च्या घराला एखाद्या राजेशाही वाड्याप्रमाणे सजवण्यात आलंय. घराची अंतर्गत सजावटही अत्यंत कलरफुल आहे. घराच्या बाहेर स्विमींगपूल, बसण्यासाठी खास खुर्च्या, सुंदर हिरवळ आणि खास तुळशी वृंदावनही ठेवण्यात आलंय. घराच्या भिंती वारली पेंटिंग्जनी सजवण्यात आल्यात. किचनमध्ये नव्या भांड्यांसह, गॅस, फ्रिज आणि अनेक सोयीसुविधा देण्यात आल्यात.

हे आहेत 'मराठी बिग बॉस'च्या घरातील स्पर्धक -

1) रेशम टिपणीस

Loading...
Loading...

2) विनीत बोंडे

3) आत्साद काळे

4) जुई गडकरी

5) अनिल थत्ते

6) स्मिता गोंदकर

7) आरती सोळंकी

8) भूषण कडू

9) उषा नाडकर्णी

10) मेघा धाडे

11) सई लोकूर

12) पुष्कर जोग

13) ऋतुजा धर्माधिकारी

14) सुशांत शेलार

15) राजेश श्रृंगारपुरे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 17, 2018 03:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close