मुंबई, 16 मार्च : जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) ने थैमान घातलेलं असताना त्याचा परिणाम बॉलिवूड त्याचप्रमाणे हॉलिवूड इंडस्ट्रीवरही झाला आहे. अनेक चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर गेल्या काही दिवसात प्रदर्शित करण्यात आलेले काही चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या सगळ्याचा परिणाम इंडस्ट्रीच्या आर्थिक बाबींवर देखील झाला आहे. WHO कडून यासंदर्भात अनेक उपाययोजना आखण्यात येत आहेत. अनेक स्तरावर जागतिक आरोग्य संघटनेचे काम सुरू आहे.
(हे वाचा- Coronavirus चं जगभरात थैमान आणि दीपिका घरी बसून काय करतेय पाहा)
देशामध्ये कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO-World Health Organisation) ने दीपिका पदुकोण (Deepika Padukon) आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) या अभिनेत्रींना देशभरात जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या देशामध्ये कलाकारांना फॉलो करणारे अनेक जण आहेत. अशापरिस्थित दीपिका किंवा प्रियांका या सेलिब्रिटींनी कोरोनाबाबत जनजागृती केली तर कोरोनाबाबतची घ्यावयाची काळजी सर्वांपर्यंत पोहोचेल या उद्देशाने WHO ने हे आवाहन केले आहे.
I now nominate:@deepikapadukone@priyankachopra@Schwarzenegger@CTurlington
to take the #SafeHands challenge by sharing their video & calling on at least another 3 people to join us! Together, we can beat #COVID19!
— Tedros Adhanom Ghebreyesus (@DrTedros) March 13, 2020
कोरोनाव्हायरसमुळे जगाच्या बर्याच भागांत लॉकडाउन झाले आहे. सोशल मीडियामधून अनेक जण याबाबत जनजागृती करीत आहेत. WHO महासंचालक डॉ. टेड्रॉस अधानोम यांनी ट्विटरवर अनेक सेलिब्रिटींना टॅग केले आहे. त्यांनी या सेलिब्रिटींना 'सेफ हँड्स चॅलेंज' घेण्याची विनंती केली आहे. दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा यांना टॅग करत त्यांनी लिहिले आहे की, ग्लोबल स्टार्सनी सेफ हँड्स चॅलेंज घेत तुमचा व्हिडिओ शेअर करा आणि आणखी तीन लोकांना हे चॅलेंज द्या.