कंगनासोबत आरोप-प्रत्यारोप सुरू असताना संजय राऊतांना मिळाली आनंदाची बातमी

कंगनासोबत आरोप-प्रत्यारोप सुरू असताना संजय राऊतांना मिळाली आनंदाची बातमी

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणौत आणि संजय राऊत यांच्यामध्ये आरोग-प्रत्यारोप सुरू आहेत

  • Share this:

मुंबई, 8 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोबत सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपामध्ये शिवसेना नेता आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांना आनंदाची बातमी मिळाली आहे.

संजय राऊत आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. आताच कंगना रणौतसोबत त्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू होते. यात पक्षाने राऊतांना पक्षाच्या मुख्य प्रवक्ताचं पद सोपवलं आहे. संजय राऊन शिवसेनाचं मुखपत्र सामना याचे कार्यकरी संपादकही आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रणौत हिने मुंबई पोलिसांबद्दल वक्तव्य करताना मुंबई ही पीओकेसाऱखी वाटत असल्याचे म्हटले होते. यानंतर संजय राऊतांनी तिच्यावर कडक शब्दात टीका केली होती. त्यात ते म्हणाले होते की जर त्यांची इतकी हिम्मत असेल तर त्यांनी अहमदाबादची तुलना मिनी पाकिस्तानशी करुन दाखवावी.

मुंबई पोलिसांवर अभिनेत्री कंगना रणौत हिच्या वक्तव्यानंतर चिडलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल एका वृत्त वाहिनीशी बोलताना हरामखोर या शब्दाचा अर्थही उलगडून सांगितला आहे. आतापर्यंत कंगनावर सडेतोड टीका करणारे संजय राऊत म्हणाले, अभिनेत्री कंगना रणौत म्हणजे नॉटी गर्ल आहे.

हे ही वाचा-"...तर मी कायमची मुंबई सोडून देईन..." - कंगना रणौत

हरामखोर म्हणजे मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजे खट्याळ मुलगी आहे आणि बेईमान आहे. असं मला वाटतं.. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. काही दिवसांपूर्वीच कंगनाने मुंबई ही पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते असं ट्विट केलं होतं. त्यानंतर कंगना आणि संजय राऊत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू होते.

दुसरीकडे अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) 9 सप्टेंंबर रोजी मुंबईत दाखल होणार आहे. तत्पूर्वी मुंबईत विविध हालचाली सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मुबंई महापालिकेने कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्स या मुंबईतील कार्यालयाबाहेर नोटीस लावली आहे. कंगनाने त्याठिकाणचे काम त्वरित बंद करावे अशी नोटीस याठिकाणी लावण्यात आली आहे. परिसरात बेकायदेशीर बांधकाम झाल्याचा आरोप मुंबई महापालिकेने केला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: September 8, 2020, 5:14 PM IST

ताज्या बातम्या