Home /News /entertainment /

मराठमोळी 'फॅशन' अभिनेत्री मुग्धा गोडसे कशी पडली 14 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात; शेअर केला प्रेमाचा किस्सा

मराठमोळी 'फॅशन' अभिनेत्री मुग्धा गोडसे कशी पडली 14 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात; शेअर केला प्रेमाचा किस्सा

अभिनेत्री मुग्धा गोडसे (Actress mugdha godse) गेली अनेक वर्ष या अभिनेता आणि मॉडेलबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे.

    मुंबई, 22 जानेवारी: प्रेमात वयाची अट नसते, त्यासाठी दोघांमध्ये फक्त प्रेम असणं गरजेचं असतं. याची अनेक उदाहरणं आपल्याला बॉलीवुडमध्ये पाहायला मिळतील. ज्यांच्या वयात खूप अंतर आहे. बॉलीवूड अभिनेता (Bollywood actor) राहुल देव (Rahul dev) आणि बॉलीवूड अभिनेत्री मुग्धा गोडसे (Mugdha godse) हे जोडपंही याला अपवाद ठरलं नाही. राहुल देव हा मुग्धापेक्षा 14 वर्षांनी मोठा आहे. तरीही त्यांच्या प्रेमात वयाचा अडथळा कधी ठरला नाही. राहुल देव आणि मुग्धा 2003  पासून एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघंही आता बॉलीवूडपासून थोडंस दूर गेले आहेत. मात्र त्यांचं प्रेम अजून फुलतचं चाललं आहे. कारण ते दोघंही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांचे लवी डवी फोटो शेअर करत असतात. यावरून त्यांच्या प्रेमाचं बॉंडींग सहज लक्षात येतं. त्यांच्या या फोटोंना चाहत्यांकडूनही भरभरून प्रतिसाद मिळतो. राहुल देव आणि मुग्धा यांच्या वयात 14 वर्षांच अंतर आहे. याबाबत त्यांनी नुकतेच त्यांचे विचार मांडले आहेत. झूम डिजिटलने घेतलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, कोणत्याही नात्याला वयाच्या तराजूत तोललं नाही पाहिजे. वयाचा निकष लावून प्रेमाकडे पाहिलं नाही पाहिजे, असं मला अजिबात वाटतं नाही. प्रेम म्हणजे आपण शॉपिंग करायला जाण्यासारखं नसतं. म्हणजे आपल्या लाल बॅग पाहिजे म्हणुन ती आपण खरेदी केली, असं प्रेमाच्या बाबतीत होत नाही. फक्त आपल्यालाच माहित असतं की आपण प्रेमात पडलो आहोत. प्रेम ही सहज होणारी गोष्ट आहे. मधुर भंडारकर यांच्या 'फॅशन' या चित्रपटातून मुग्धाने पदार्पण केलं होतं. या चित्रपटात कंगना आणि प्रियांकासुद्धा होते. मुग्धाने यावेळी प्रियांकाबाबतचा अनुभवही सांगितला आहे. तसेच स्वतः च्या कामाबद्दल बोलताना मुग्धाने सांगितलं की, सेटवर येईपर्यंत मी काय करत होते, ते मलाच माहित नव्हतं. पण शुटींग चांगल्याप्रकारे पार पडलं. या व्यतिरिक्त त्यांनी आपल्या प्रेमाचे खिस्सेही व्यक्त केले. दोघंही पहिल्यांदा कसे भेटले याबाबत सांगताना मुग्धाने सांगितलं की, राहुल आणि मी आमच्या एका कॉमन मित्राच्या लग्नात भेटलो होतो. तेथून आम्ही दोघं एकमेकांना ओळखू लागलो. कालांतराने आमची मैत्री घट्ट होत गेली. मुग्धा बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. पण ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमी चर्चेत राहिली आहे. यापूर्वी दिग्दर्शक मधुर भंडारकर आणि अभिनेता रणवीर शौरी यांच्यासोबतही मुग्धाचं नाव जोडलं गेलं आहे. मुग्धाने ऑल द बेस्ट, हिरोईन, साहेब, बीवी आणि गँगस्टर रिटर्न्स यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bollywood News

    पुढील बातम्या