मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /किसिंग सीनमुळं आली होती चर्चेत; शिल्पा शिरोडकर का झाली बॉलिवूडमधून गायब?

किसिंग सीनमुळं आली होती चर्चेत; शिल्पा शिरोडकर का झाली बॉलिवूडमधून गायब?

तिनं जणू स्वत:चा असा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. तरी देखील काही वर्षांतच तिनं बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला. आज जवळपास 12 वर्षानंतर एका मॅगझिनच्या निमित्तानं ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

तिनं जणू स्वत:चा असा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. तरी देखील काही वर्षांतच तिनं बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला. आज जवळपास 12 वर्षानंतर एका मॅगझिनच्या निमित्तानं ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

तिनं जणू स्वत:चा असा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. तरी देखील काही वर्षांतच तिनं बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला. आज जवळपास 12 वर्षानंतर एका मॅगझिनच्या निमित्तानं ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

मुंबई 28 मे: शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) ही 90च्या दशकात बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. (bollywood actress) तिला अभिनयात फारशी गती नव्हती. परंतु आपल्या बोल्ड आणि मादक अदांच्या जोरावर जवळपास एक दशक तिनं बॉलिवूडमध्ये काम केलं. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण तिनं वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ज्या काळात किसिंग सीन करण्याच्या विचारानेच इतर अभिनेत्रींना घाम फुटायचा त्याच काळात शिल्पानं बोल्ड सीन्सद्वारे खळबळ उडवली होती. (shilpa shirodkar bold scene) तिनं जणू स्वत:चा असा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. तरी देखील काही वर्षांतच तिनं बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला. आज जवळपास 12 वर्षानंतर एका मॅगझिनच्या निमित्तानं ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

द वंडर मॉम हे दुबईमधील एक प्रसिद्ध मॅगझिन आहे. या मॅगझिनच्या कव्हर पेजवर शिल्पा शिरोडकरकरचा फोटो झळकला अन् ती पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये चर्चेत आली. या मॅगझिननं सुपर मॉम म्हणून तिचं कौतुक केलं. या मॅगगिझनच्या निमित्तानं एक प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला अन् तो म्हणजे इतकं प्रचंड यश मिळालेलं असतानाही शिल्पानं बॉलिवूडला रामराम का ठोकला? काही वर्षांपूर्वी फिल्म फेअरला दिलेल्या मुलाखतीत तिनं यामागचं खरं कारण सांगितलं होतं.

‘आधी पुशअप्स मग सेल्फी’; फोटो मागणाऱ्या महिलेकडून मिलिंद सोमणनं करुन घेतला व्यायाम

ती म्हणाली होती, “मी भ्रष्टाचार या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण हा चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर किशन कन्हया हिट झाला पण त्याचं सर्व श्रेय अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांना मिळालं. त्यानंतर हम सुपरहिट झाला पण त्याचं संपूर्ण श्रेय अमिताभ बच्चन आणि रजनिकांत यांची जोडी घेऊन गेलं. माझ्या आयुष्यात जे सुपरहिट चित्रपट मी केले त्याचं श्रेय मला मिळालं नाही पण जे फ्लॉप झाले त्याचं खापर मात्र माझ्यावरच फोडलं गेलं. मला पैसे मिळत होते. बोल्ड दृश्यांमुळं मी प्रसिद्ध झाले होते पण कामाचं समाधान मिळत नव्हतं अखेर वैतागून मी बॉलिवूडला रामराम ठोकला.” सध्या ती लंडनमध्ये आपल्या पतीसोबत राहात आहे. तिला दोन मुलं आहेत.

First published:
top videos

    Tags: Bollywood actress