मुंबई, 25 मे- बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले आहेत. बॉलिवूडचे व्हिलन अशी ओळख असलेले आशिष विद्यार्थी यांनी 60 व्या वर्षी पुन्हा विवाह केला आहे. आशिष विद्यार्थी यांनी रुपाली बरुआ यांच्याशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. या दोघांनी मित्रपरिवाराच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज पद्धतीने विवाह केला. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. आशिष यांचे हे दुसरं लग्न आहे, पण त्यांचे पहिलं लग्न कोणासोबत झालेलं माहिती आहे का?
आशिष यांची पहिली पत्नी सध्या काय करते?
आशिष यांनी हिंदी चित्रपटांसह तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. यावरून आशिष विद्यार्थी किती टॅलेंटेड आहे याचा अंदाज येऊ शकतो. दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या आशिष यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसरं लग्न करत नव्याने संसार थाटला आहे. . वयाच्या या टप्प्यावर त्यांनी पुन्हा लग्न करून चर्चेत आले आहेत. आशिष यांनी गुरुवारी रुपालीसोबत लग्न केले. दुसऱ्या लग्नानंतर आशिष म्हणाले की, "आयुष्याच्या या टप्प्यावर रुपालीशी लग्न करणं ही एक खूपच खास फिलिंग आहे." पण आशिष यांच्या पहिल्या बायकोबद्दल, ती कोण आहे आणि ती काय करते याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
कोण आहे पहिली पत्नी ?
फार कमी लोकांना माहित आहे की, आशिष यांचे पहिले लग्न अभिनेत्री राजोशी विद्यार्थीसोबत केले होते. राजोशी ही देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका देखील आहे. दोघांना एका मुलागा असून त्याचे नाव अर्थ विद्यार्थी असं आहे. आशिष यांची पहिली पत्नी राजोशी लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते पण ती दिसायला खूप सुंदर आहे. ती साधे आयुष्य जगत असली तरी प्रत्यक्षात ती आयुष्यात एखाद्या सुंदर अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.
आशिष विद्यार्थींची नवी बायको आहे तरी कोण? दिसायला आहे लईच देखणी
अभिनेत्री शकुंतला बरवा यांच्याशी काय आहे कनेक्शन ?
आशिष यांची पहिली पत्नी राजोशी ही प्रसिद्ध अभिनेत्री शकुंतला बरवा यांची मुलगी आहे.आपल्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट देणाऱ्या शकुंतला यांची राजोशी ही एकुलती एक मुलगी आहे. हिंदीसोबतच शकुंतला यांनी बंगाली सिनेसृष्टीतही खूप नाव कमावले आहे. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2019 मध्ये आलेला 'द बॉडी' चित्रपटात त्यांनी काम केलं आहे, याशिवाय त्यांनी टीव्हीवरील 'सुहानी सी एक लड़की' (2019) आणि 'इमली' (2020) सारख्या काही हिंदी टीव्ही शोमध्ये काम केले आहे. 2015 मध्ये त्यांना एका टीव्ही मालिकेसाठी स्टार परिवार पुरस्कार देखील मिळाल होता.
आशिष विद्यार्थी यांनी मल्याळम, कन्नड अशा 11 हून अधिक भाषांमध्ये काम केलं आहे. जवळपास 200 चित्रपटांत ते झळकले आहेत. ‘बिच्छू’, ‘अर्जुन पंडित’, ‘जिद्दी’, ‘बादल’ यांसारख्या चित्रपटात त्यांनी साकारलेला व्हिलन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.