मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सुशांतचे 15 कोटी कोणत्या खात्यात वळवले? EDला रियाकडे मिळाली नाही रक्कम

सुशांतचे 15 कोटी कोणत्या खात्यात वळवले? EDला रियाकडे मिळाली नाही रक्कम

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी दाखल केलेल्या या FIR नुसार रियाने सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटी रुपये काढले. दरम्यान News18 ला मिळालेल्या ईडीच्या सूत्रांनुसार, ईडीला अद्याप रियाच्या खात्यामध्ये 15 कोटी रुपये मिळाले नाही आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 08 ऑगस्ट : मुंबई, 08 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death) च्या मृत्यू प्रकरणातील तपासाला सुशांतचे वडील केके सिंह (KK Singh) यांनी FIR दाखल केल्यानंतर एक वेगळे वळण मिळाले होते. सिंह यांनी पाटणा पोलिसांत रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात FIR दाखल केली. त्यांनी या FIR मध्ये केलेल्या आरोपानुसार रियाने सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटी रुपये काढले.

दरम्यान News18 ला मिळालेल्या ईडीच्या सूत्रांनुसार, ईडीला अद्याप रियाच्या खात्यामध्ये 15 कोटी रुपये मिळाले नाही आहेत. ईडीच्या सूत्रांचे असे म्हणणे आहे की, याचा अर्थ असा होतो की सुशांतच्या खात्यातून पैसे आणखी कुठेतरी ट्रान्सफर झाले आहेत. दरम्यान आता हे 15 कोटी रुपये कुणाच्या खात्यामध्ये वळवण्यात आले, असा सवाल कायम आहे. सुशांतचे ज्या ज्या बँकांमध्ये खाते आहे, त्या बँकांच्या कर्मचाऱ्यांशी ईडी बातचीत करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

(हे वाचा-'सुशांतच्या संपत्तीवर वडिलांचाच हक्क', सर्वोच्च न्यायालयात सादर प्रतिज्ञापत्र)

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ईडीकडून मनी लाँड्रिंगच्या अँगलने ईडीकडून तपास केला जात आहे. शुक्रवारी रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी करण्यात आली. तब्बल 8 तास ही चौकशी सुरू होती. दरम्यान News18 च्या सूत्रांनुसार शुक्रवारी रियाने अशी माहिती दिली की तिच्या नावावर 3 कंपनी देखील आहेत. मात्र इतर प्रश्नांची उत्तरे देणे तिने टाळले आहे. जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे 'मला माहित नाही' किंवा 'मला कसं तरी होत आहे', अशी दिली आहेत. त्याचबरोबर शुक्रवारी सुशांतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी हिची देखील चौकशी झाली. आज ईडी कार्यालयामध्ये रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती दाखल झाला आहे.

(हे वाचा-'सुशांतची केवळ ही एकच संपत्ती माझ्याकडे आहे', रिया चक्रवर्तीचा दावा)

सीबीआयने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती तसंच आई-वडिलांवर आरोपपत्र दाखल केले आहे.  सीबीआयने आईपीसी कलम  306, 341, 342, 420, 406 अणि 506 अंतर्गत हे केस दाखल केली आहे. मीडिया अहवालांच्या मते सीबीआयकडून रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

ईडीने रियाकडून तिच्या मालमत्तेची कागदपत्रं मागितली होती. मात्र रियाने आपली मालमत्तेची कागदपत्रं ईडीसमोर सादर केली नाहीत. तिनं आपली कागदपत्रं सीए रितेश शाहकडे असल्याचं सांगितलं मात्र रितेश शाह यांनीदेखील आपल्याकडे कागदपत्रं असल्याचं नाकारलं. त्यानंतर रियाने आपण कागदपत्रं कुठे ठेवलीत हे आठवत नसल्याचं सांगितलं. अत्यंत कमी उत्पन्न असतानाही रिया चक्रवर्तीने मुंबईत 2 प्रॉपर्टी खरेदी केल्यात. तिच्या आणि कुटुंबीयांच्या नावावर या प्रॉपर्टी आहेत.

First published:

Tags: Sushant Singh Rajput