• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • कधी संपणार प्रतीक्षा? 'या' कारणामुळे चाहते शाहरुख खानवर नाराज

कधी संपणार प्रतीक्षा? 'या' कारणामुळे चाहते शाहरुख खानवर नाराज

सुमारे 5 वर्षांपूर्वी म्हणजेच 30 ऑगस्ट 2016 ला रात्री 8.34 मिनिटांनी शाहरुख खानने चाहत्यांना एक वचन दिलं होतं.

 • Share this:
  नवी दिल्ली, 30 ऑगस्ट : अभिनय आणि वैविध्यपूर्ण चित्रपटांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) गेल्या काही काळापासून चित्रपटसृष्टीपासून काहीसा दूर असल्याची चर्चा आहे. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. 2018 नंतर शाहरुखचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. काही प्रोजेक्टसवर तो काम करत असल्याची चर्चा आहे. परंतु, त्या प्रोजेक्टसच्या सद्यःस्थितीबाबत कोणतीही अधिकृत माहिती त्याने दिलेली नाही. 5 वर्षांपूर्वी म्हणजेच 30 ऑगस्ट 2016 ला खुद्द शाहरुखने ट्विट करत आगामी चित्रपटाविषयी सूचित केलं होतं. मात्र गेल्या 5 वर्षांत म्हणजेच 1825 दिवसांत शाहरुखने आपल्या कोणत्याही नव्या प्रोजेक्टस किंवा प्रकल्पांबाबत माहिती दिलेली नाही. त्यामुळे फॅन्सला त्याच्या आगामी चित्रपटांची प्रतिक्षा कायम आहे. याबाबतच वृत्त `बॉलिवूड हंगामा डॉट कॉम`नं दिलं आहे. जाणून घेऊया सविस्तर... सुमारे 5 वर्षांपूर्वी म्हणजेच 30 ऑगस्ट 2016 ला रात्री 8.34 मिनिटांनी शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटने (Red Chillies Entertainment) एक ट्विट केले होते. या व्टिटचे फॅन्स आणि फिल्म इंडस्ट्रीने कौतुक केले होते. त्यात अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले होते की शाहरुख खान दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या सोबत पुढील चित्रपट करत आहे. या चित्रपटाचे नाव झिरो (Zero) असल्याचे नंतर स्पष्ट झाले. 21 डिसेंबर 2018 ही चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची तारीखही त्यात नमूद करण्यात आली होती. या ट्विटला रिप्लाय देत हे खूप स्पेशल असून, गोड देखील आहे, याची वाट पाहूयात असे नमूद केले होते. सांगितलेल्या तारखेला हा चित्रपट रिलीज झाला. शाहरुख खान आणि व्हिएफएक्समुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र हा चित्रपट अपेक्षित यश मिळवू शकला नाही. झिरोचे अपयश शाहरुख खानवर खोलवर परिणाम करुन गेले. त्यानंतर त्याला आत्मपरिक्षण करण्याची गरज भासू लागली. यामुळे पुढील चित्रपटासाठी त्याने खूप वेळ घेतला. या काळात शाहरुखने अनेक प्रतिथयश निर्माते आणि दिग्दर्शकांच्या स्क्रिप्टस (Scripts) नाकारल्या. झिरो चित्रपटासाठी सुमारे 200 कोटी खर्च करण्यात आला. हे ही वाचा-शाहरुखच्या ‘पठान’मध्ये सलमानसुद्धा झळकणार; VIDEO होतोय VIRAL परंतु, चित्रपट 100 कोटींचीही कमाई करु शकला नाही. या चित्रपटात कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्याही भूमिका होत्या. उत्तर प्रदेशातून मुंबईत आणि तेथून नासाच्या माध्यमातून अंतराळात जाणाऱ्या एका कमी उंची असलेल्या व्यक्तीच्या जीवनावर हा चित्रपट आधारित होता. त्यात व्हिएफएक्सचा (VFX) मोठा वापर केला गेला होता. परंतु, याबाबी चित्रपटाला आर्थिक आधार देऊ शकल्या नाहीत. ऑक्टोबर 2019मध्ये शाहरुख खान दाक्षिणात्य दिग्दर्शक अटली (Atlee) याच्यासोबत मसालापट विषयी चर्चा करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र काही दिवसांनंतर राज निडीमोरु आणि कृष्णा डी.के. यांचा चित्रपट त्याने साइन केल्याचे वृत्त आले. या दिग्दर्शकांनी एका मुलाखतीत याला दुजोराही दिला होता. त्यानंतर शाहरुख राजकुमारी हिरानी यांच्यासोबत चित्रपट करत असल्याची चर्चा होती. त्यानंतर गेल्या वर्षी आदित्य चोप्रा यांच्या य़शराज फिल्मच्या (Yash Raj Films) पठाण (Pathan) या भव्य अॅक्शनपटात शाहरुख खान प्रमुख भुमिकेत असून, `वॉर` फेम सिध्दार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असल्याची बातमी पुढे आली होती. यामुळे शाहरुखच्या फॅन्सनी आनंद व्यक्त केला होता. या चित्रपटात दिपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमदेखील आहेत. पठाण हा चित्रपट गुप्तचर विश्वावर (Spy World) आधारित असून टायगर (सलमान खान अभिनीत) चित्रपटाप्रमाणे यातील प्रमुख पात्र असेल असे सांगण्यात आले होते. नोव्हेंबर 2020 मध्ये शाहरुखने या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले. यातील लांब केसांचा त्याचा लूक इंटरनेटवर व्हायरल देखील झाला. याचाच अर्थ सुपरस्टार शाहरुख खान सध्या तीन चित्रपट प्रकल्पांवर काम करत आहे. परंतु, त्याने या तीनपैकी एकाही चित्रपटाबाबत अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. वायआरएफच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त आपल्या आगामी चित्रपटांमध्ये पठाणची घोषणा करण्याची योजना आखत आहे. परंतु, चित्रपटगृह बंद असल्याने ही योजना अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे शाहरुख याबाबत अधिकृतपणे बोलला नसावा. पण राजकुमार हिरानींच्या चित्रपटाची निर्मिती त्याचीचच रेड चिली एंटरटेनमेंट करत असूनही याबाबत अधिकृत माहिती शाहरुखने दिलेली नाही. त्यात अटली यांच्या चित्रपटाचे शुटिंग पुढील महिन्यापासून सुरु होत आहे. गेल्या 5 वर्षात या तीनही चित्रपटांविषयी शाहरुख अधिकृतपणे न बोलल्याने त्याचे फॅन्स नाराजी व्यक्त करत आहेत. या चित्रपटांबाबत शाहरुखने पुष्टी द्यावी अशी त्यांची मागणी आहे.
  First published: