मुंबई, 20 नोव्हेंबर : बी-टाऊनमधील अनेकजण सध्या लग्नाच्या बेडीत अडकत असल्याच्या बातम्या समोर येत आहे. यातच गेल्या बऱ्याच दिवसांपासून एका लोकप्रिय कपलच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. हे लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल. दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलंय. दोघांच्याही लग्नाविषयी नवनवीन बातम्या सध्या समोर येताना दिसतात. अशातच अभिनेत्रीच्या वडिलांनी म्हणजे अभिनेता सुनील शेट्टीने लग्नाविषयी अपडटे शेअर केली आहे.
आगामी क्राईम वेब सीरिज 'धारावी बँक' च्या लॉन्च इव्हेंटमध्ये सुनील शेट्टीने अथिया आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्यातील नात्याची पुष्टी केली. अथिया आणि राहुलचे लग्न कधी होणार असे विचारले असता, त्याने आधी गंमतीत सांगितले की, बेटा माझे लग्न झाले आहे. तेव्हा अथियाचे लग्न 'लवकरच होईल'. त्यामुळे राहुल-अथिया पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.
हेही वाचा - कोमात गेलेल्या Aindrila Sharma ची मृत्यूशी झुंज अपयशी, 24 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
काही महिन्यांपूर्वी, या जोडप्याने त्यांच्या इन्स्टा वर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामुळे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं. दोघे अनेकवेळा एकत्र स्पॉट झाले आहेत. केएल राहुल सध्या त्याच्या कामात व्यग्र असल्यामुळे त्याच्या वेळेनुसार लग्नाची तारीख ठरवली जाणार आहे. त्यामुळे अथिया आणि केएल राहुल दोघांचेही चाहते त्यांच्या लग्नासाठी मोठ्या प्रमाणावर उत्साही आहेत. त्यामुळे आता दोघे लग्नाची घोषणा अधिकृतरित्या करणार की गुपचूप लग्न उरकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
View this post on Instagram
पिंकविलाच्या वृत्तानुसार, अथिया आणि केएल राहुल एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नव्हे तर खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या 'जहाँ' या निवासस्थानी लग्न करणार आहेत. सजावट आणि व्यवस्थेसाठी वेडिंग प्लॅनरही बुक करण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या बऱ्याच दिवसांपासून अथिया आणि केएल राहुल एकमेकांना डेट करत आहे. अनेकदा दोघांना सोबत स्पॉट केलं आहे. दोघांचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एकमेकांच्या पोस्टवर कमेंटही करतात. त्यामुळे त्यांच्या नात्यावर कधीच शिक्कामोर्तब झाला आहे. आता दोघांच्या लग्नासाठी सगळ्यांची उत्सुकता वाढली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Cricket, Kl rahul, Marriage, Sunil shetty