मुंबई 26 जुलै : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच विविध कारणांसाठी चर्चेत असते. कधी तिच्या प्रोफेशनल लाइफमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे. काही वर्षांपूर्वी मलायका आणि अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) हे बॉलिवूडचं पॉवर कपल म्हणून ओळखलं जायचं. त्यांची जोडी फारच पसंत केली जायची. पण लग्नाच्या अनेक वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
1998 साली मलायकाने अरबाज खानशी विवाह केला होता. त्यावेळी मलायका ही प्रसिद्ध मॉडेल होती. काही वर्षांपूर्वी करण जोहरच्या (Karan Johar) ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या शोमध्ये तिने तिच्या लग्नानंतर खान कुटुंबात तिचा सून म्हणून कसा स्वीकार झालां याबद्दल सांगितलं होतं. करणने तिला प्रश्न विचारला होता की, ‘एक सुपरसेक्सी मॉडेल पारंपरिक खान कुटुंबात कशी सामवली?’
याविषयी बोलताना मलायका म्हणाली होती की, “जेव्हा मी प्रत्यक्षात खान कुटुंबात पहिल्यांदा गेले तेव्हा, मी पाहिलं की सोहेल डेनिम शॉर्ट्स मध्ये बसला होता. त्याच्या टेरेसवर ऊन घेत होता. आणि मला तेव्हाच जाणवलं हे माझ्या पद्धतीचं घर आहे. मला वाटतं सगळं काही योगायोगाने घडून आलं. हे खूपचं सुंदर मला स्वीकारणारं कुटुंब होतं.”
View this post on Instagram
पुढे ती म्हणाली, “ते खरचं कधीच तुमच्यावर प्रेशर टाकत नाहीत की तुम्ही असंच असायला हवं, किंवा तुम्ही ते केलंच पाहीजे, असं कधीच घडलं नाही. मला आठवतय त्यांनी अगदी दोन्ही बाहूंनी मला स्वीकारलं होतं. आणि मला वाटतं की तेचं आताही आहे, फक्त मीच नाही तर जे कोणी या कुटुंबात आले त्या सगळ्यांसाठी.”
आथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर? UK मध्ये असा घालवतायत वेळ
यानंतर मलायकाने असंही म्हटलं की, खान कुटुंबिय विचाराने अगदी मॉडर्न आहेत. तर तिला जर कधी पुर्नजन्म मिळाला तर तिला खान कटुंबातच लग्न करायला आवडेल. ती असही म्हणाली की, तिच्या सासूबाई तिच्या कामाचं कौतुक करायच्या.
दरम्यान 2016 साली मलायका आणि अरबाज विभक्त झाले. तर आता मलायका अभिनेता अर्जून कपूरला डेट करत आहे तर अरबाज इटालियन मॉडेल जॉर्जिया अँड्रीयानीला डेट करत आहे. मलायका आणि अरबाजला 19 वर्षीय मुलगा देखील आहे. त्याचा ते दोघेही सांभाळ करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arjun kapoor, Entertainment, Malaika arora, Salman khan