• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • राज कुंद्रानं कसं केलं होतं प्रपोज? शिल्पा शेट्टीनं सांगितली तिची अनोखी लव्हस्टोरी

राज कुंद्रानं कसं केलं होतं प्रपोज? शिल्पा शेट्टीनं सांगितली तिची अनोखी लव्हस्टोरी

शिल्पाला पटवण्यासाठी राज कुंद्रा तिला महागड्या भेटवस्तू (Expensive Gifts) द्यायचा.

 • Share this:
  मुंबई 23 जुलै: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्लील चित्रपट निर्मितीच्या अवैध धंद्याच्या आरोपाखाली अटक झाल्यानं त्यांच्याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या प्रेमकहाणीलाही आता उजाळा मिळत आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची प्रेमकथा एखाद्या बॉलिवूड चित्रपटात शोभेल अशीच आहे. प्रणय, वाद आणि अनुनय याची रेलचेल त्यांच्या प्रेमकथेत होती. पिंकव्हिलाबरोबर (Pink villa) झालेल्या संभाषणात शिल्पाने आपली ही प्रेमकहाणी उलगडली होती. राज यांनी तिला कसं आपल्या प्रेमात पाडलं याचे किस्से तिनं सांगितले होते. तिला प्रभावित करण्यासाठी राज कुंद्रा यांनी किती प्रयत्न केले हे तिनं सांगितलं होतं. शिल्पाला पटवण्यासाठी राज कुंद्रा तिला महागड्या भेटवस्तू (Expensive Gifts) द्यायचा. तिनं आपल्याशी लग्न करावं यासाठी त्यानं चक्क बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या जलसा बंगल्यासमोर (Jalasa) एक फ्लॅट खरेदी केल्याचंही तिनं सांगितलं. या आठवणी सांगताना ती म्हणाली, राज मला व्हर्साची(Versace) या जगप्रसिद्ध ब्रँडसच्या बॅग्स भेट देऊन प्रभावित करण्याचा प्रयत्न करत होता. त्यानं मला व्हर्साची ब्रँडसच्या तीन वेगवेगळ्या रंगाच्या बॅग्स पाठवल्या होत्या. ते बघून मी थक्क झाले होते. तो अशा भेटवस्तू देऊन सतत मला आपल्या मनातील गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत होता. मात्र आपली मैत्री आणि नातं मला बिघडवायचं नाही, त्यामुळं तू हे सगळं थांबव, असं मी त्याला सांगितलं. मी लग्न करण्यासाठी तयार होते; पण लंडनला(London) शिफ्ट होण्याची तयारी नसल्यानं मी त्याला सगळं थांबवण्याचा इशारा दिला होता.’ शिल्पा शेट्टीच्या घरी पोलिसांचा छापा; पाहा कारवाईचा Exclusive video शिल्पाबरोबर राहण्यासाठी राज कुंद्रा यांनी मुंबईत अमिताभ बच्चन यांच्या जलसा या बंगल्यासमोर एक फ्लॅट खरेदी केला होता. ही आठवण सांगताना ती म्हणाली, ‘नंतर जेव्हा आम्ही एकमेकांना मनातल्या गोष्टी सांगितल्या आणि लग्नाचा निर्णय घेतला. तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही भेटल्यानंतर त्यांनी मला अमिताभ बच्चन यांचा जलसा हा बंगला बघण्यासाठी बोलावलं. मी तयारी दाखवल्यानंतर राज म्हणाला की, त्यानं जलसाच्यासमोर एक मजलाच विकत घेतला आहे. ते ऐकून मी आश्चर्यचकित झाले. लंडनमधील या श्रीमंत व्यावसायिकानं मुंबईत फ्लॅट का खरेदी करावा असा प्रश्न मला पडला होता. दुसर्‍या दिवशी त्यानं मला हा फ्लॅट बघण्यासाठी बोलावलं. राजने फ्लॅट विकत घेतलेली इमारत अजून बांधून पूर्ण झालेली नव्हती. आम्ही ती जागा पाहायला गेलो तेव्हा त्या इमारतीचा फक्त दुसरा मजला बांधून झाला होता; त्या इमारतीतील सातवा मजला विकत घेतल्याचं राज यानं अतिशय उत्साहानं सांगितलं होतं. तो इथून काम करतो की लंडनमधून यानं काहीही फरक पडत नाही, असंही त्यानं सांगितलं. त्यावेळीच माझ्या लक्षात आलं की त्यानं भारतात राहण्याचा निर्णय घेतला आहे.’ Raj Kundra नव्या अ‍ॅपसाठी करणार होता ‘या’ मराठी अभिनेत्रीची निवड; नाव ऐकून बसेल धक्का अखेर राज कुंद्रा याच्या प्रेमाचा विजय झाला. त्याच्या प्रेमानं शिल्पाचा विश्वास जिंकला आणि तिनं त्याच्याशी लग्नाला होकार दिला. 22 नोव्हेंबर 2009 रोजी खंडाळा (Khandala) इथं त्यांचा राजेशाही विवाह सोहळा(Marriage Ceremony) पार पडला. राज आणि शिल्पा यांना विवान आणि सामीशा ही दोन मुलं आहेत.
  First published: