मुंबई, 27 जून : सध्या लॉकडाऊनमध्ये बॉलिवूड सेलिब्रेटींचे थ्रोबॅक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अगदी महानायक अमिताभ बच्चनपासून सलमान खानपर्यंत अनेकांचे थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अशात आता शाहरूख खानचा सुद्धा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात त्याच्यासोबत कतरिना कैफ सुद्धा दिसत आहे. हा व्हिडीओ 'जब तक है जान' या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा आहे.
जब तक है जान या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा कतरिना आणि शाहरुखचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ फिल्मफेअरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यात कतरिना शाहरुखच्या मिठीत दिसत आहे. ते एक सीन शूट करत आहेत मात्र हा सीन शूट झाल्यानंतरही शाहरुख तिला सोडत नाही. ज्यानंतर सर्वजण हसू लागतात. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यावर कतरिना आणि शाहरुखचे चाहते कमेंट करताना दिसत आहेत.
शाहरुखच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तो शेवटचा कतरिना आणि अनुष्का शर्मासोबत झीरो सिनेमात दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही त्यानंतर त्यानं कोणत्याही सिनेमात काम केलं नाही. तर कतरिनाचा सूर्यवंशी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.