राणी मुखर्जीला पाहिल्यावर सलमान खानला आठवते ‘ही’ भाजी!

राणी मुखर्जीला पाहिल्यावर सलमान खानला आठवते ‘ही’ भाजी!

अभिनेत्री राणी मुखर्जी मागच्या काही दिवसांपासून तिचा आगामी सिनेमा ‘मर्दानी 2’मुळे खूपच चर्चेत आहे.

  • Share this:

मुंबई, 07 डिसेंबर : अभिनेत्री राणी मुखर्जी मागच्या काही दिवसांपासून तिचा आगामी सिनेमा ‘मर्दानी 2’मुळे खूपच चर्चेत आहे. सध्या ती या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बीझी असून नुकतीच तिनं सलमान खान होस्ट रिअलिटी शो बिग बॉस 13 मध्ये हजेरी लावली. यावेळी या दोघांनीही खूप धम्माल केली. या दरम्यानचा राणी आणि सलमानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामुळे सलमान खाननं राणीला पाहिल्यावर त्याला एका विशिष्ट भाजीची आठवण येते हे सांगितलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सुरुवातीला राणी मुखर्जी सलमान खानला त्याच्या लग्नाच्या मुद्द्यावरुन चिडवताना दिसते. त्यानंतर मग सलमान तिला एक टास्क देतो. ज्यात सलमान खान काही सिनेमांची नावं अभिनय करुन दाखवतो आणि तिला ते ओळखायचं असतं. त्यानंतर राणी मुखर्जी सलमान एक टास्क देते ज्यामध्ये सलमानला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची होती. यावेळी राणीनं सलमानला विचारलं मला पाहिल्यावर तुला कोणती भाजी आठवते. यावर सलमान झटकन उत्तर देतो. बटाट्याची भाजी.

बॉलिवूड गाजवणाऱ्या 'या' अभिनेत्री आहेत सैनिकांच्या लेकी!

 

View this post on Instagram

 

#Mardaani2 se #RaniMukherjee aayi #WeekendKaVaar ke stage par! Dekhiye inka yeh mazedaar game aaj raat 9 baje. Anytime on @voot @vivo_india @beingsalmankhan #BiggBoss13 #BiggBoss #BB13 #SalmanKhan

A post shared by Colors TV (@colorstv) on

सलमानच्या या उत्तरानं राणीला आश्चर्याचा धक्का बसतो. ते पाहिल्यावर सलमान बटाट्याच्या भाजीची स्तुती करायला सुरुवात करतो. हे ऐकून राणीची कळी खुलते. राणीचा मर्दानी 2 हा सिनेमा एका सामाजिक विषयावर आधारित आहे. सध्या देशभरात वेगवेगळया भागात होत असलेले बलात्कार हा सर्वांत मोठा चिंतेचा विषय आहे आणि या सिनेमात याच विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना टार्गेट करुन त्यांच्यावर अमानुष अत्याचार करुन मग त्यांची हत्या करणाऱ्या खलनायकाला पकडणं हे सर्वात मोठं आव्हान राणी समोर आहे.

कल्की कोचलिननं केलं बेबी बंप फोटोशूट, पाहा PHOTO

'मर्दानी 2'मध्ये राणी मुखर्जी एका पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. जी एका चलाख आणि कुख्यात खलनायच्या शोधात तिच्या टीमचं प्रतिनिधित्व करणार आहे. पहिल्या पार्ट प्रमाणे या पार्टमध्येही राणी स्टंट सीन करताना दिसणार आहे. हा सिनेमा 13 डिसेंबरला रिलीज होणार. डिसेंबरमध्ये एक-दोन नाही तर तब्बल 5 बिग बजेट सिनेमा रिलीज होणार आहेत. पानिपत-6 डिसेंबर, पति पत्नी और वो- 6 डिसेंबर, मर्दानी 2- 13 डिसेंबर, दबंग 3-20 डिसेंबर, आणि गुड न्यूज-27 डिसेंबर हे सर्व सिनेमा एकाच महिन्यात रिलीज होत आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर पाहायला मिळणार आहे.

बॉलिवूडमध्ये येण्याआधी अभिनेत्री करायची बेबी सीटरचं काम, बदलले होते डायपर्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2019 04:44 PM IST

ताज्या बातम्या