Home /News /entertainment /

कतरिनाच्या बर्थडे पार्टीत असं काय झालं की, सलमान-शाहरुख झाले एकमेकांचे वैरी

कतरिनाच्या बर्थडे पार्टीत असं काय झालं की, सलमान-शाहरुख झाले एकमेकांचे वैरी

कतरिना कैफच्या बर्थडे पार्टीत सलमान-शाहरुखमध्ये जोरदार भांडण झालं होतं आणि त्यानंतर या दोघांच्या मैत्रीत फूट पडली.

  मुंबई, 24 एप्रिल : बॉलिवूडच्या सुपरस्टार्स बद्दल जेव्हा बोललं जात त्यावेळी त्यात शाहरुख आणि सलमानचं नाव येतंच. या दोघांनीही आतापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. त्यांच्या अभिनयाचे तर करोडो चाहते आहेत. पण ज्या सलमान-शाहरुखच्या जोडीला एकेकाळी चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं त्यांच्या मैत्रीत सुद्धा काही वर्षांपूर्वी मोठा दुरावा आला होता. जेव्हा या दोघांमध्ये काही कारणानं जोरदार भांडण झालं होतं तेव्हा या दोघांनीही एकमेकांशी बोलणं तर दूरच पण एकमेकांबद्दलही बोलणं सोडून दिलं होतं. 2008 मध्ये कतरिनाच्या बर्थडे पार्टीमध्ये प्रत्येकानं या दोघांचं ते भांडण पाहिलं होतं. या पार्टीत उपस्थित असलेला प्रत्येकजण त्या भांडणाचा साक्षीदार आहे. पार्टी सुरू असताना शाहरुख आणि सलमान एकमेकांच्या शोची खिल्ली उडवत होते मात्र या मस्करीनं नंतर वेगळंच वळण घेतलं. सुरुवातीला सलमाननं शाहरुखच्या 'क्या आप पांचवीं पास से तेज हैं'ची खिल्ली उडवली त्यावर शाहरुखनं सुद्धा सलमानच्या 'दस का दाम'ची खिल्ली उडवली. नंतर या मस्करीचं रुपांतर वादात झालं. ...जेव्हा टुरिस्टनी वरुण धवनला हॉटेल स्टाफ समजून घासायला लावली होती भांडी
  View this post on Instagram

  Karan + Arjun ... fond memories @iamsrk

  A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

  सूत्रांच्या माहितीनुसार ही मस्करी वादात त्यावेळी बदलली जेव्हा सलमाननं शाहरुखच्या वाढत्या लोकप्रियतेवरुन त्याला टोमणा मारला. त्यानंतर शाहरुखनं ऐश्वर्या राय बद्दल काही टिप्पणी केली ज्यामुळे सलमानचा पारा चढला. त्यानंतर या दोघांमध्ये जोरदार भांडण झालं आणि मग या दोघांच्या मैत्री अनेक वर्षांसाठी दुरावा आला. सोहा अली खानची लेक म्हणतेय गायत्री मंत्र, कोरोना दरम्यान व्हायरल झाला VIDEO एका मुलाखतीत याबाबत बोलताना शाहरुख म्हणाला, मी वडीलांसारखा विचार करतो आणि सलमान एका लहान मुलासारखा आहे. आमच्या दोघांमध्ये कोणत्याच गोष्टी समान नाहीत. आमची वागण्या-बोलण्याची पद्धत सुद्धा खूप वेगळी आहे. आम्ही एकत्र असताना चांगले क्षण एकमेकांसोबत शेअर केले मात्र आता आम्ही आमच्या आयुष्यात खूश आहोत. आम्ही आता एकमेकांचे मित्र नाही.
  View this post on Instagram

  A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

  फक्त शाहरुखच्याच बाजून असं पाहायला मिळालं असं नाही तर सलमाननं सुद्धा एका मुलाखतीत म्हटलं, शाहरुख मला माझ्या भावासारखा होता. जेव्हा त्याच्या संघर्षाचा काळ होता त्यावेळी तो मला सर म्हणत असे. मी अनेकदा त्याला लोकांकडे काम मागताना पाहिलं आहे. मात्र आता तो खूप बदलला आहे. यानंतर काही वर्षांपूर्वीच या दोघांच्या मैत्रीतील दुरावा काहीसा कमी झाला सर्व काही विसरुन दोघं एकत्र आले. एकीकडे शाहरुखनं सलमानच्या ट्यूबलाइटमध्ये कोमिओ म्हणून हजेरी लावली तर दुसरी सलमान सुद्धा शाहरुखच्या झीरोमध्ये दिसला होता. (संपादन- मेघा जेठे.) राखी सावंतनं शेअर केला BIKINI PHOTO, सोशल मीडियावर बोल्ड टॅटूची चर्चा
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Salman khan, Shahrukh khan

  पुढील बातम्या