मुंबई, १४ मार्च २०१९- आजही आमिर खान आणि सलमान खान ही दोन नावं घेतली की त्यांचा अंदाज अपना अपना हा सिनेमा डोळ्यासमोर येतो. १९९४ मध्ये आलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फारसं चांगलं प्रदर्शन केलं नव्हतं. मात्र काही वर्षांनी हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये तुफान गाजला. आजही अनेक सिनेप्रेमींच्या तोंडावर या सिनेमाचे डायलॉग आहेत.
सिनेमातील आमिर आणि सलमानची केमिस्ट्रीचं आजही अनेकजण भरभरून कौतुक करतात. त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री जेवढी तगडी आहे तेवढीच त्यांची ऑफस्क्रिन केमिस्ट्रीही मजबूत आहे.
एका मुलाखतीत आमिरने त्याचा आणि सलमानचा एक किस्सा सांगितला होता. आमिर म्हणाला होता की, ‘एकदा मी आणि सलमानने दारू प्यायली होती. दारूच्या नशेत आम्ही रिक्षातून फिरत होतो. त्यावेळी मी रिक्षावाल्याला पैसे दिले नव्हते. कारण मी माझ्याकडे कधीच पैसे बाळगत नाही.’
‘मी नेहमी किरणकडून पैसे मागून घेतो किंवा माझा मॅनेजर मला गरज पडेल तसे पैसे देतो. पण मी कधीच स्वतःकडे पैसे ठेवत नाही. त्यामुळेच माझे पैसे सलमानला द्यावे लागले.’
सध्या आमिर त्याच्या आगामी सिनेमाच्या तयारीत लागला आहे. यासाठी त्याने अमेरिकेतील प्रसिद्ध ट्रेनरसोबत चर्चाही केली आहे. लवकरच आमिर आणि सलमानचा क्लासिक कॉमेडी सिनेमा अंदाज अपना अपनाचा सिक्वल येत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
आमिरने या बातमीचं स्वागत करताना म्हटले की, या सिनेमाच्या सिक्वलसाठी रणवीर सिंग आणि वरुण धवनची निवड केली गेली पाहिजे. मात्र याबद्दल रणवीर आणि वरुण यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
VIDEO: कोकणातला होलीकोत्सव पाहिला का?