अभिषेकने मला लग्नातही बोलावलं नाही म्हणजे..., राणीने व्यक्त केली होती तिच्या मनातली खंत

अभिषेकने मला लग्नातही बोलावलं नाही म्हणजे..., राणीने व्यक्त केली होती तिच्या मनातली खंत

एकेकाळी अभिषेक आणि राणीच्या अफेअरची बॉलिवूडमध्ये खूप चर्चा झाली होती. पण नंतर अभिषेकनं ऐश्वर्या रॉयशी लग्न केलं.

  • Share this:

मुंबई, 27 एप्रिल : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचं नाव ऐश्वर्याच्या आगोदर अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. करिश्मा कपूर सोबत त्याचा साखरपुडा झाल्यानंतर त्यांचं नातं तुटलं. फक्त करिश्माच नाही तर एकेकाळी अभिषेक नावं राणी मुखर्जीसोबतही जोडलं गेलं होतं आणि त्यांच्या अफेअरच्या चर्चाही बराच काळ चालल्या पण नंतर तिलाही सोडून अभिषेकनं ऐश्वर्याशी लग्नगाठ बांधली. एवढंच नाही तर अभिषेकच्या लग्नात राणीला आमंत्रणही देण्यात आलं नव्हतं. या सर्व गोष्टींचा खुलासा राणीनं एका मुलाखतीत केला.

 

View this post on Instagram

 

❤️Our Togethernesscaptured by The Divine Light of Our Lives LOVE YOU AARADHYA

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

वाचा : मुंबईमध्ये लक्झरी कार नाही तर चक्क रिक्षातून फिरताना दिसली सारा अली खान

एकेकाळी अभिषेक आणि राणीच्या अफेअरची बॉलिवूडमध्ये खूप चर्चा झाली. पण अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नानंतर एका मुलाखतीत राणीनं अभिषेकशी ब्रेकअपच्या चर्चांवर मौन सोडलं. तसेच तिनं अभिषेक सोबत आपलं अफेअर कधीच नव्हतं आम्ही फक्त चांगले मित्र होतो पण असं असतानाही त्यानं मला त्याच्या लग्नाचं निमंत्रणही दिलं नव्हतं असंही तिनं सांगितलं. यावेळी बोलताना राणी म्हणाली, 'जर आपल्याला एखादी व्यक्ती त्याच्या लग्नात बोलवत नाही तेव्हा आपल्याला समजतं की त्याच्यासोबत आपण कुठे उभे आहोत आणि हेही लक्षात येतं की, तुम्ही मित्र तर होता मात्र ती मैत्री फक्त सेट पर्यंत मर्यादित होती.' अशी खंत राणीनं या मुलाखतीत व्यक्त केली.

वाचा : अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गरोदर, पूर्व पत्नी मेहर जेसियानं दिली 'ही' प्रतिक्रिया

राणी पुढे म्हणाली, 'या घटनेनंतर मी समजून गेले की, आमच्यातील नातं हे फक्त सहकलाकाराचं होतं. आम्ही मित्र कधीच नव्हतो. पण अभिषेकसोबत केलेल्या कामाचा अनुभव मला कायम लक्षात राहील.' याचवेळी ऐश्वर्याबाबत बोलताना राणी म्हणाली, 'मी जेव्हाही ऐश्वर्याला भेटते तेव्हा तिला नेहमी शुभेच्छा देते. ती आमच्या काळातील एक यशस्वी अभिनेत्री आहे.'

वाचा : ‘एकदा तरी तिने मला कॉल करायचा होता...’ जेव्हा दीपिका पदुकोणने रणबीरला म्हटलं होतं विश्वासघाती, त्याने दिली होती ही प्रतिक्रिया

राणीनं अभिषेक फक्त माझा मित्र होता असं म्हणत हा विषय टाळला असला तरी मीडिया रिपोर्टनुसार, अभिषेकची आई जया बच्चन यांना राणीशी अभिषेकचं असलेलं नातं मान्य नव्हतं. त्यामुळेच अभिषेक-राणीचं नातं संपलं आणि अभिषेकनं ऐश्वर्याशी लग्न केलं. अभिषेक आणि राणीनं 'बंटी और बबली', 'युवा', 'लागा चुनरी मे दाग', 'कभी अलविदा ना कहना','बस इतना सा ख्वाब है' या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2019 12:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading