मुंबई, 23 डिसेंबर : आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असणार एक कपल. गेल्या 2 वर्षापासून हे कपल एकमेकांना डेट करत आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाची चर्चा अधून मधून सुरू असते. सध्या लग्नाचा सिझन असल्यामुळे रणबीर आणि आलिया लग्न कधी करणार या प्रश्नाची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. 2020 मध्ये हे कपल लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा आधी सुरू होती. पण आलिया भट्टला एवढ्यात लग्न करायचं नाही असं तिने स्वत: सांगितलं आहे.
काय म्हणाली आलिया?
लग्नाच्या चर्चांबद्दल आलिया म्हणते, ‘मी आत्ता फक्त 25 वर्षाची आहे त्यामुळे मला एवढ्या लवकर लग्न करायचं नाही. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये आलियाने सांगितलं, मला सगळेच जण विचारत असतात की आम्ही लग्न कधी करणार? पण मी आत्ता फक्त 25 वर्षांची आहे. एवढ्या लहान वयात लग्न करणं म्हणजे खूप घाई होईल. मला एवढ्यात लग्न करायचं नाही. सध्या मी माझ्या करिअरवर फोकस करत आहे.’ तर दुसरीकडे रणबीर कपूरचं म्हणणं आहे की 'मी 2021 मध्ये लग्न करणार.' आता यांचं लग्न नक्की कधी होणार हे येणाऱ्या काळात समजलेच.
View this post on Instagram
रणबीर आणि आलिया हे बॉलिवूडमधील हॉट कपल आहे. चाहत्यांनाही त्यांची जोडी अतिशय आवडते. अनेकदा पार्ट्यांमध्ये ते एकत्र दिसतात. कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, रणबीर कपूर आणि आलिया पहिल्यांदाच ब्रह्मास्त्र सिनेमामध्ये एकत्र दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन यांचाही महत्वाचा रोल या चित्रपटात आहे. शिवाय आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी या सिनेमातही झळकणार आहे.