मुंबई, 21 मे : बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या मॅरिड लाइफमुळे खूप चर्चेत आहे. नवाझुद्दीनची पत्नी आलियानं त्याला लॉकडाऊनमध्ये घटस्फोटाची नोटीस पाठवल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांवरही खळबळजनक आरोप केले होते. यानंतर आता नवाझुद्दीनचे वादग्रस्त किस्से पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जेव्हा माजी मिस इंडिया आणि नवाझची एक्स गर्लफ्रेंड निहारिका सिंहनं त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. विवाहित असतानाही नवाझुद्दीन निहारिकासोबत रिलेशिनशिपमध्ये होता.
नवाझुद्दीन सिद्दीकी आणि निहारिकाची ओळख मिस लवली या सिनेमाच्या सेटवर झाली होती. निहारिकानं एका मुलाखतीत सांगितलं की जेव्हा ते दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यावेळी नवाझुद्दीन विवाहित होता मात्र त्यानं ही गोष्ट माझ्यापासून लपवली होती. डेट केल्यानंतर अनेक दिवसांनंतर मला ही गोष्ट समजली की त्याची पत्नी गावी राहते. यानंतर मी जेव्हा सत्य त्याच्याकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केली तेव्हा त्याच्याकडून मला उडवा-उडवीची उत्तरं मिळाली. मला त्याचं सत्य समजलं होतं त्यामुळे त्याने मलाच तू मला समजून घेत नाहीस असं म्हटलं होतं. तो माझ्या कोणत्याच प्रश्नाचं नीट उत्तर देत नव्हता.
Me Too अभियाना अंतर्गत निहारिकानं नवाझुद्दीन सिद्दीकीवर अनेक गंभीर आरोप केले होते. तिनं सांगितलं, जेव्हा एकदा सकाळी मी माझ्या घरी होते. तो रात्रभर शूटिंग पूर्ण करून परतला होता. त्याचं शूटिंग माझ्या घराच्या आसपासच होतं. त्यामुळे मी त्याला नाश्त्यासाठी बोलावलं होतं. जेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा त्यानं मला मागून मिठी मारली. मी त्याला धक्का देत दूर करण्याचा प्रयत्न केला पण त्यानं मला सोडलं नाही. नवाझुद्दीनचं लग्न झालेलं असतानाही त्याची बायको कशी असावी याची स्वप्न तो बघायचा. त्याचं स्वप्न होतं की, त्याची पत्नी एखादी मिस इंडिया किंवा अभिनेत्री असावी.
एका सिनेमामुळे अनन्या होईल देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, निर्मातीचा दावा
घटस्फोटाची नोटीस पाठवल्यानंतर आलियानं बॉलिवूड लाइफ या वेबसाइडला दिलेल्या मुलाखतीत सिद्दीकी कुटुंबीयांवर शारीरिक आणि मानसिक शोषणाचे आरोप केले आहेत. आलिया म्हणाली, लग्नानंतर वर्षभरातच मला त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली होती. मात्र मी याबाबत कोणाकडे अवाक्षरही काढलं नाही. मी सहन करत राहिले. नावझुद्दीनच्या भावानं माझ्यावर हातही उचलला. नवाझुद्दीनच्या पहिली पत्नीही त्याच्या कारणानं त्याच्यापासून वेगळी झाली असंही आलियानं या मुलाखतीत स्पष्ट केलं.
प्रतीक्षा संपली! धक धक गर्लचं Candle गाणं 'या' दिवशी होणार रिलीज
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood