Home /News /entertainment /

आपल्या सौंदर्यानंच प्रेक्षकांची मनं जिंकायच्या माला सिन्हा; 12 लाखांसाठी लावलेली अब्रुची बाजी

आपल्या सौंदर्यानंच प्रेक्षकांची मनं जिंकायच्या माला सिन्हा; 12 लाखांसाठी लावलेली अब्रुची बाजी

माला यांच्या जीवनाशी जोडलेलं एक सत्य असं आहे जे ऐकून कोणीही थक्क होईल. काही पैसे वाचवण्यासाठी माला सिन्हा यांनी आपल्या अब्रुची बाजी लावली होती.

  मुंबई 16 जुलै : 70 च्या दशकातील  लोकप्रिय अभिनेत्री माला सिन्हा (Mala Sinha) अत्यंत सुदंर होती. तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे अनेक चाहते होते. हिंदीशिवाय त्यांनी बंगाली आणि नेपाळी चित्रपटांतही काम केलं होतं. एक अभिनेत्रीच नाही तर गायिकाही होत्या माला सिन्हा. तब्बल 40 वर्षे सिनेसृष्टीत सक्रिय होत्या माला. पण माला यांचं नाव त्या अभिनेत्रींमध्ये सामील आहे ज्यांनी काही सत्य लपवून ठेवलं होतं. माला यांच्या जीवनाशी जोडलेलं एक सत्य असं आहे जे ऐकून कोणीही थक्क होईल. काही पैसे वाचवण्यासाठी माला सिन्हा यांनी आपल्या अब्रुची बाजी लावली होती.

  HBD: विवाहानंतर आमना शरिफने बदलला होता धर्म; पाहा कसा होता अभिनेत्रीचा प्रवास

  मायानगरी मुंबईत आपलं करिअर करण्यासाठी आलेल्या माला सिन्हा यांची ओळख गुरूदत्त यांच्याशी झाली होती. माला यांची सुंदरता पहून गुरूदत्त यांनी मालाला  ‘प्यासा’ या चित्रपटात काम दिलं. 1957 साली आलेला चित्रपट प्यासाचे दिग्दर्शक आणि निर्माते दोन्ही गुरुदत्त होते. प्यासाला बॉक्सऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला आणि रातोरात माला स्टार बनल्या. त्यानंतर त्यांच्याकडे चित्रपटांच्या अनेक ऑफर्स येऊ लागल्या. माला आपल्या करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताच त्यांच्या घरी इन्कम टॅक्सची धाड पडली आणि त्यांच् घारातून 12 लाख रुपये जप्त करण्यात आले. तत्कालीन वृत्तांनुसार माला यांच्या घराच्या बाथरुमच्या भिंतीतून ही रक्कम काढण्यात आली होती. 70 च्या दशकात 12 लाख रुपये ही किमंत फार मोठी होती. त्यामुळे ही रक्कम जप्त होण्यापासून वाचण्यासाठी माला यांना फार मोठी किंमत चुकवावी लागली होती.

  'जगात माझं कुणीच नाही, मला मारून टाका'; उपचारासाठीही पैसे नसलेल्या आजारी ज्येष्ठ अभिनेत्रीने मागितला मृत्यू

  हे पैसे वाचवण्यासाठी माला यांनी कोर्टात भयानक वक्तव्य केलं होतं, जे ऐकून साऱ्यांनाच मोठा धक्का बसला होता. तिने एका चिठ्टीत लिहून दिलं होतं की, हे पैसे तिने वेश्या व्यवसायातून कमावले आहेत. सांगण्यात येत होतं की मालाने आपल्या वडिलांच्या दबावातून हे वक्तव्य केलं होतं. हे पैसे वाचवण्यासाठी माला यांना आपल्या अब्रुची पर्वा सोडून द्यावी लागली होती. तिला असं वक्तव्य करण्यासाठी तिच्या वकिलानेच हा सल्ला दिला होता. त्यामुळे पैसे तर वाचले पण लोकांच्या मनातून माला यांच्यासाठीचा आदर कायमचा निघून गेला होता.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood actress, Entertainment

  पुढील बातम्या