दिग्दर्शकानं ऐश्वर्यावर केले होते गंभीर आरोप, बिग बींनी दिलं सडेतोड उत्तर; वाचा नेमकं काय घडलं

दिग्दर्शकानं ऐश्वर्यावर केले होते गंभीर आरोप, बिग बींनी दिलं सडेतोड उत्तर; वाचा नेमकं काय घडलं

ज्यावेळी एका दिग्दर्शकानं ऐश्वर्यावर गंभीर आरोप लावले होते तेव्हा अमिताभ बच्चन यांनी तिची पाठराखण करत मीडियाला स्पष्टीकरण दिलं होतं. वाचा काय होतं प्रकरण...

  • Share this:

मुंबई, 27 मे : लॉकडाऊनमुळे सध्या सर्वजण आपापल्या घरी कैद आहेत. या लॉकडाऊनचा परिणाम मनोरंजन क्षेत्रावरही होताना दिसत आहे. अशात बॉलिवूड कलाकारांचे जुने किस्से सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत. सध्या ऐश्वर्या रायशी संबंधीत एक किस्सा सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. ऐश्वर्या राय सध्या तिचं मॅरिड लाइफ एन्जॉय करताना दिसत आहे. अशात तिचं तिच्या सासू-सासऱ्यांसोबत असेलेलं खास बॉन्डिंग कोणापासूनच लपलेलं नाही. अशात सध्या इंटरनेटवर ऐश्वर्या आणि अमिताभ बच्चन यांचा तो किस्सा खूप व्हायरल होत आहे ज्यावेळी एका दिग्दर्शकानं तिच्यावर गंभीर आरोप लावले होते आणि अमिताभ बच्चन यांनी तिची पाठराखण केली होती.

हा किस्सा 2011 मधील आहे. त्यावेळी हिरोइन सिनेमावरून बराच मोठा वाद झाला होता. या सिनेमाच्या मुख्य भूमिकेसाठी ऐश्वर्याची निवड करण्यात आली होती आणि नंतर एका न्यूज चॅनेलकडून दिग्दर्शकाला ऐश्वर्या प्रेग्नन्ट असल्याचं समजलं. सिनेमाचं शूटिंग सुद्धा सुरू झालं होतं आणि मग काही काही दिवसातच ऐश्वर्यानं हा सिनेमा सोडून दिला होता.

ऐश्वर्यावर दिग्दर्शकानं लावले होते आरोप

दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी ऐश्वर्यावर आरोप केले होते की, तिनं प्रेग्नंट असल्याची माहिती त्यांच्यापासून लपवून ठेवली होती. त्यांच्यासाठी हा खूप खास प्रोजेक्ट होता. जेव्हा ऐश्वर्यानं मध्येच सिनेमा सोडून दिला त्यामुळे भंडारकरांना खूप नुकसान सोसावं लागलं होतं.

अक्षय कुमार लॉकडाऊनमध्ये करतोय आगामी सिनेमाची तयारी, असं सुरू आहे काम

View this post on Instagram

✨Always ✨

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

करिनानं केलं ऐश्वर्याला रिप्लेस

ऐश्वर्यानं हा सिनेमा सोडल्यानंतर या सिनेमासाठी मधुर भंडारकर यांनी करिनाला साइन केलं. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि त्यानंतर ऐश्वर्यावर भंडारकर यांनी अनेक आरोप केले होते. ते म्हणाले, जर ऐश्वर्यानं तिच्या प्रेग्नन्सीबद्दल सुरुवातीलाच कल्पना दिली असती तर आम्ही तिच्यासोबत शूटिंगला सुरुवात केलीच नसती. ते या सिनेमासाठी दिड वर्ष काम करत होते आणि हे सर्व असं अचानक घडलं. ज्यामुळे भंडारकर यांचं खूप नुकसान झालं होतं.

मधुर भंडारकर यांचं झालं मोठं नुकसान

दिग्दर्शक मधुर भंडारकर म्हणाले, ऐश्वर्याच्या या निर्णयामुळे माझ्यावर खरं तर संकटाचा पहाडच कोसळला होता. मी पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेलो होतो. ज्या लोकांची रोजीरोटी माझ्या सिनेमावर अवलंबून होती त्या लोकांच्या भीतीनं मी 8 दिवस माझ्या ऑफिसमध्ये गेलो नव्हतो. मी बरेच दिवस गप्प राहिलो मात्र आता मला वाटतं सत्य काय आहे हे सर्वांसमोर आलंच पाहिजे.

View this post on Instagram

✨Happyyy Anniversary Pa n Ma✨ Love, Health and Happiness always God Bless

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

अमिताभ बच्चन यांनी केली होती सूनेची पाठराखण

मधुर भंडारकर यांनी ऐश्वर्यावर सिनेमाच्या नुकसानाबाबत लावलेल्या आरोपांनंतर अमिताभ बच्चन यांनी मीडियासमोर या गोष्टीचं स्पष्टीकरण दिलं होतं. सूनेची पाठराखण करत ते म्हणाले, जेव्हा ऐश्वर्यानं सिनेमा साइन केला त्यावेळी मधुर भंडारकर यांनी माहित होतं की तिचं लग्न झालं आहे. तर तुमचं असं म्हणणं आहे का की, कलाकारांनी लग्न करू नये. त्यांनी मुलं जन्माला घालू नये. मला नाही वाटत कॉन्ट्रॅक्टमध्ये असा कोणताही नियम असावा.

आराध्याच्या जन्मानंतर केलं कमबॅक

आराध्याच्या जन्माच्या काही वर्षांनंतर ऐश्वर्यानं पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं. तिनं 'सरबजीत' आणि 'जज्बा' असे दोन सिनेमा केले. मात्र हे सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार चालले नाहीत. मात्र करण जोहर दिग्दर्शित आणि अनुष्का शर्मा, रणबीर कपूर स्टारर 'ऐ दिल हैं मुश्किल'मध्ये ऐश्वर्याच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं आणि हा सिनेमा सुद्धा सुपरहिट ठरला.

राम गोपाल वर्मानं COVID-19 वर तयार केला पहिला सिनेमा, पाहा Coronavirus Trailer

'भाग्यश्रीला पकड आणि KISS कर...' फोटोग्राफरनं सलमानला सांगितलं, पण...

First published: May 27, 2020, 2:16 PM IST

ताज्या बातम्या