कसं आहे बेबो-साराचं नातं? करिना म्हणते; 'तिच्या सोडून जाण्यानं मला...'

कसं आहे बेबो-साराचं नातं? करिना म्हणते; 'तिच्या सोडून जाण्यानं मला...'

सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान आणि करिना कपूर यांच्या नात्याची चर्चा तर नेहमीच सोशल मीडियावर पाहायला मिळाते.

  • Share this:

मुंबई, 11 मे : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान आणि तिची सावत्र मुलगी अर्थात सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान यांच्या नात्याची चर्चा तर नेहमीच सोशल मीडियावर पाहायला मिळाते. सारा सुद्धा अनेक मुलाखतीत करिनाची स्तुती करताना दिसून येते. करिना आणि तिचं नातं चांगल्या मैत्रींणींसारखं असल्याचं सारा नेहमीच सांगताना दिसते. पण आता पहिल्यांदानच करिनानं सारासोबतच्या तिच्या नात्याचा खुलासा केला आहे.

लॉकडाऊनमध्ये करिनाची एक जुनी मुलाखत खूप व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात करिना तिच्या फॅमिली बद्दल बोलताना दिसत आहे. बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार करिनानं या मुलाखतीत सारा आणि इब्राहिमसोबत तिचं नातं नेमकं कसं आहे याचाही खुलासा केला. आपल्या सावत्र मुलांसोबत करिनाचं नातं कसं आहे याविषयी करिनानं सांगितलं.

शाहरुख खानसोबत Video Call वर बोलण्याची संधी, पण करावं लागेल हे काम

करिना म्हणाली, माझं सारा आणि इब्राहिम दोघांवरही खूप प्रेम आहे. आम्ही सर्व लंडनला व्हेकेशनसाठी सुद्धा गेलो होतो. सारा आणि इब्राहिम दोघंही मोकळ्या स्वभावाचे आहेत. जेव्हा सारा मुंबईमधून जात होती तेव्हा मला खूप दुःख झालं होतं. कारण तिचं असं सर्वांना सोडून जाणं मला आवडत नाही. आमच्यात खूप चांगलं बॉन्डिंग आहे.

सारा आणि करिनाच्या नातं सोशल मीडियावर अनेकदा चर्चेचा विषय ठरलं आहे. पण त्यांच्या बॉन्डिंगबाबत अनेकांना प्रश्न पडतो. कारण या दोघी नेहमीच एकमेकांच्या चांगल्या मैत्रीणी असल्यासारख्या वावरताना दिसतात. अशात मध्यंतरीच्या काळात सारानं करिनाच्या शोमध्ये हजेरी लावली होती. ज्यावेळी या दोघींमधलं बॉन्डिंग पाहायला मिळालं होतं.

सारा अली खानचं वजन एकेकाळी होतं 95 किलो; अशी झाली 'फॅट टू फिट', पाहा VIDEO

First Published: May 11, 2020 08:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading