कंगनाच्या SEXUAL पार्टनरबद्दल समजल्यावर काय होती पालकांची प्रतिक्रिया, अभिनेत्रीनं स्वतःच केला खुलासा

कंगनाच्या SEXUAL पार्टनरबद्दल समजल्यावर काय होती पालकांची प्रतिक्रिया, अभिनेत्रीनं स्वतःच केला खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच तिच्या बोल्ड विधानांमुळे चर्चेत असते. अनेकदा ती आपली मतं स्पष्टपणे मांडताना दिसते.

  • Share this:

मुंबई, 30 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच तिच्या बोल्ड विधानांमुळे चर्चेत असते. अनेकदा ती आपली मतं स्पष्टपणे मांडताना दिसते. पण नुकत्याच एक अतिशय बोल्ड मुद्द्यावर मत मांडल्यानं कंगना खूपच चर्चेत आली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत कंगनानं तिच्या रिलेशनशिपविषयी बोलताना, तिच्या सेक्शुअली अ‍ॅक्टिव्ह असण्याबद्दल जेव्हा तिच्या पालकांना समजलं त्यावेळी त्यांची रिअ‍ॅक्शन काय होती याचा खुलासा केला.

पिंकव्हिलानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार कंगना सांगते, 'माझ्या आईवडीलांना जेव्हा माझा सेक्शुअल पार्टनर आहे हे समजलं त्यावेळी ते चकीच झाले होते. खरं तर आई वडीलांना यावर कम्फर्टेबल असायला हवं की त्यांच्या मुलांचे सेक्शुअल पार्टनर आहेत. त्यांनी आपल्या मुलांना संतुलित सेक्स आणि प्रोटेक्शनचा वापर याविषयी माहिती द्यायला हवी.'

शाहरुखची लेक करतेय हॉलिवूडमध्ये एंट्री, पहिल्या सिनेमाचा Teaser रिलीज

कंगाना पुढे म्हणाली, 'पार्टनर्स बदलणं चांगली गोष्ट नाही. ही गोष्ट तुमची सिस्टीम बिघडवते. पार्टनर्स न बदलण्याविषयी वैज्ञानिक कारण आहे जे आपल्याला पार्टनर्स बदलण्याच्या घातक परिणामांची माहिती देतं. खरं तर लोकांनी आपला सेक्शुअल पार्टनर सतत बदलू नये आणि टीनएजर्सनी सेफ सेक्सवर फोकस करायला हवा. सध्या सेक्स बद्दलचे वेगवेगळे विचार आणि या सर्व गोष्टी मिळून अतिशय वाईट असं कॉकटेल तयार झालं आहे.'

The Fast and the Furious च्या दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा आरोप

कंगना म्हणाली, 'माझी पणजोबा-पणजी यांना तर जेवणाच्या ताटाची अदलाबदल करावी तसं बदलण्यात आलं होतं आणि त्यांना त्याचवेळी सांगण्यात आलं होतं की आता हा तुमचा पती आणि ही तुमची पत्नी आहे. असा तो काळ होता मात्र असं केल्यानं त्या एकाच व्यक्तीशी तुमचे सर्व सेक्शुअल इमोशन्स ट्रान्सफर व्हायला सुरुवात होते.'

पिंकव्हालाच्या वृत्तानुसार कंगना सांगते, 'सेक्स हा प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा तुम्हाला त्याची गरज वाटते तेव्हा तुम्ही ते करायला हवं. यामुळे संकोचण्याची गरज नाही. अनेक मुलांचे आईवडील की आपले पवित्र ग्रंथ आपल्याला सेक्स करण्याची परवानगी देत नाहीत. मात्र असं अजिबात नाही. अनेक ब्रह्मचारी लोक त्याची सेक्शुअल एनर्जी कोणत्यातरी दुसऱ्या एनर्जीमध्ये बदण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असत.'

कंगनाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर कंगना लवकरच एकेकाळच्या तमिळ अभिनेत्री आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात कंगना जयललितांची व्यक्तिरेखा साकारणार असून या सिनेमासाठी तिनं तब्बल 24 कोटी रुपये एवढं मानधन घेतल्याची चर्चा आहे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित हा बायोपिक तेलगू आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदीत 'जया' तर तेलुगुमध्ये 'थलावयी' असं या बायोपिकचं नाव असणार आहे.दाक्षिणात्य दिग्दर्शक विजय हे जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिकचं दिग्दर्शन करणार आहेत.

Paris Fashion Week मध्ये दिसला ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचा जलवा, पाहा PHOTO

================================================================

VIDEO: भिडेंना डॉक्टरांना दाखवण्याची गरज- जितेंद्र आव्हाड

Published by: Megha Jethe
First published: September 30, 2019, 9:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading