मुंबई, 19 मार्च- मध्यप्रेदशमधील खंडवामध्ये ऑगस्ट 1929 साली किशोर कुमार यांचा जन्म झाला. किशोर कुमार यांचा फिल्मी प्रवास खूपच संस्मरणीय असा राहिला आहे. आपल्या मधूर आवजाप्रमाणेत त्यांनी त्यांच्या उत्तम अभिनयाने देखील प्रेक्षकाचं मन जिंकलं. त्यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत सुमारे 110 संगीत दिग्दर्शकांसोबत 2678 चित्रपटांमध्ये गाणी गायली. जवळपास 88 चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. असं जरी असलं तरी ते खूप मूडी होते. त्यांना प्रत्येक काम त्यांच्या मनाप्रमाणे करण्याची सवय होती.
किशोर कुमार यांच्या अशा मूडी स्वभावामुळे त्यांनी एकवेळा चित्रपट दिग्दर्शक एच. एस. रवैल यांना दुखवलं होतं. किशोर कुमार यांनी एच. एस. रवैल यांच्या हाताचा चक्का कडकडून चावा घेतला होता. विश्वास बसणार नाही पण हा किस्सा खरा आहे. त्याचं कारणही तसचं आहे.
वाचा-'आम्ही सध्या प्री-हनिमून...'अर्जुनसोबत लग्नाबद्दल विचारताच हे काय म्हणाली मलायका
किस्सा असा आहे की, चित्रपट दिग्दर्शक एच. एस. रवैल हे किशोर कुमार यांना पैसे देण्यासाठी त्यांना कोणतेही कल्पना न देता त्यांची घरी पोहचले. किशोर कुमार त्यांना घरी पाहून काही बोलले नाहीत. पण नंतर जे त्यांनी त्यांच्यासोबत केलं ते खूपच आश्चर्य़कारक होतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपट दिग्दर्शक एच. एस. रवैल हे किशोर कुमार यांना पैसे देण्यासाठी किशोर कुमार यांच्या गरी गेले होते. किशोर कुमार पहिल्यांदा त्यांना काही बोलले नाही. पैसे दिल्यानंतर
एच. एस. रवैल यांनी किशोर कुमार यांच्या हातात हात देण्यासाठी हात हात पुढे केला असता किशोर कुमार यांनी त्यांच्या हाताचा दाताने कडाडून चावा घेतला. . सुरुवातीला किशोर कुमार यांच्या या कृतीने तो अवाक झाले. त्यांनी किशोर कुमार यांना असं करण्याबद्दल विचारलं. यावर किशोर कुमार यांनी उत्तर दिले की, तुम्ही घरात येण्यापूर्वी घराच्या बाहेरची पाटी पाहण्यीच गरज होती.
बॉलिवूडमधील या दिग्गज गायक-अभिनेत्याचे 13 ऑक्टोबर 1987 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. किशोर यांचे पहिले लग्न रुमा गुहा ठाकुरता ऊर्फ रुमा घोष (1951-1958) यांच्याशी झाले. किशोर यांची दुसरी पत्नी अभिनेत्री मधुबाला (1960-1969) होती. अभिनेत्री योगिता बाली हिच्याशी (1976-1978) किशोर यांनी तिसरे लग्न केले. त्यांचे शेवटचे आणि चौथे लग्न अभिनेत्री लीना चंद्रावरकरशी (1980-1987 किशोर यांच्या मृत्यूपर्यंत) झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.