'तिला मी आवडतच नव्हते...' करीना कपूरच्या भांडणावर बिपाशा बासूनं दिली होती 'ही' प्रतिक्रिया

बिपासा बासू आणि करीना कपूर यांनी 2001मध्ये अब्बास-मस्तान यांच्या 'अजनबी' या सिनेमात एकत्र काम केलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Apr 28, 2019 04:53 PM IST

'तिला मी आवडतच नव्हते...' करीना कपूरच्या भांडणावर बिपाशा बासूनं दिली होती 'ही' प्रतिक्रिया

मुंबई, 28 एप्रिल : बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये कॅट फाइट असल्याची अनेक उदहरणं आहेत. मोठ्या पडद्यावर आई-मुलगा, बहिणी किंवा मैत्रिणींच्या भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्री रिअल लाइफमध्ये मात्र एकमेकांचं तोंड पाहणंही पसंत करत नाहीत. कोणत्याही इव्हेंटमध्ये या अभिनेत्री अनेकदा एकमेकींना जाणीवपूर्वक टाळताना दिसतात. काही वर्षांपूर्वी बिपाशा बासू आणि करीना कपूर यांच्यात अशाच प्रकारच्या भांडणाचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर बिपाशानं एका मुलाखतीत करीनाबाबत एक आश्चर्यचकीत करणारा खुलासा केला होता.

'शिल्पा शेट्टी माझ्यावर जळते', रवीना टंडनने केला चकीत करणारा खुलासा

बिपासा बासू आणि करीना कपूर यांनी 2001मध्ये अब्बास-मस्तान यांच्या 'अजनबी' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. पण हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर मात्र करीना आमि बिपाशामधील भांडण सर्वांसमोर आलं. असं म्हटलं जातं की, करीना कपूरच्या डिझायनरने एका इव्हेंटमध्ये तिच्या परवानगीशिवाय बिपाशा बासूला मदत केली होती. यावरुन नाराज झालेल्या करीनानं बिपाशासोबत भांडण केलं होतं. एवढंच नाही तर या भांडणादरम्यान करीनानं रागात बिपाशाच्या कानाखाली मारल्याच्याही अफवा त्यावेळी सगळीकडे पसरल्या होत्या.Loading...


 

View this post on Instagram
 

When the husband takes awesome pictures... posting is a must ❤️ 📷@iamksgofficial


A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu) on

चक्क एवेंजर्सचा आर्यन मॅनने केली अक्षय कुमारची कॉपी, खिलाडीने शेअर केला फोटो

2005मध्ये 'कॉफी विथ करण' या चॅट शो मध्ये सहभागी झालेल्या बिपाशाला या भांडणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी उत्तर देताना बिपाशा म्हणाली, 'मी अजनबी सिनेमाच्या शूटिंगसाठी स्वित्झर्लंडला गेले होते. त्यावेळी तिथे जवळापास 80 लोक होते. त्यापैकी कोणालाच मी ओळखत नव्हते. पण तरीही त्या लोकांनी मला खूप मदत केली. मला करीना सोबत बोलायला काहीच समस्या नव्हती, पण दुसऱ्या शेड्यूलमध्ये मला असं जाणवलं की, करीनाला मी अजिबात आवडत नाही. ती माझ्याशी बोलतही नाही.'

प्रियांका चोप्राच्या या ड्रेसच्या किंमतीत तुम्ही फिरून येऊ शकता थायलँड, जाणून घ्या किंमत
बिपाशानं पुढे सांगितलं, 'जर एखाद्या व्यक्तीनं ठरवूनच ठेवलं आहे की मला या व्यक्तीशी बोलायचंच नाही आहे, तर या गोष्टीमुळे कोणाला काहीच त्रास होत नाही. खरंतर मला या गोष्टीचा फायदाच झाला कारण मला खोट्या वागणाऱ्या लोकांसोबत राहायला आवडतच नाही. पण पर्सनल लाइफमध्ये आम्ही एकमेकींशी बोलत नसलो तरी यामुळे माझ्या प्रोफेशनल लाइफमध्ये यानं काहीही फरक पडत नाही.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2019 04:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...