Home /News /entertainment /

'करण फक्त स्टार्स सोबत काम करतो...' आयुष्मानच्या पुस्तकातला 'तो' किस्सा होतोय VIRAL

'करण फक्त स्टार्स सोबत काम करतो...' आयुष्मानच्या पुस्तकातला 'तो' किस्सा होतोय VIRAL

आयुषमान अभिनेता होण्यापूर्वी आरजे होता हे सर्वांनाच माहित आहे. आरजे असल्यामुळे त्याने एकदा करण जोहरची मुलाखत घेतली होती.

    मुंबई, 18 जून : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता बॉलिवूडमध्ये नेपोटिझमच्या वादाला नव्याने तोंड फुटलं आहे. एवढंच नाही तर करण जोहर, सलमान खान सारख्या 8 मोठ्या सेलिब्रेटीच्या विरोधात बिहारमध्ये तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे. करण जोहर फक्त स्टार किड्ससोबत काम करतो हे बऱ्याच वेळा ऐकिवात आहे पण आता सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर आयुष्मान खुरानाच्या पुस्तकातला एक किस्सा सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. आयुषमान अभिनेता होण्यापूर्वी आरजे होता हे सर्वांनाच माहित आहे. आरजे असल्यामुळे त्याने एकदा करण जोहरची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये आयुषमानने अभिनेता होण्याची इच्छा करणकडे व्यक्त केली होती. तेव्हा करणने त्याच्या ऑफिसचा नंबर आयुषमानला दिला होता. करणच्या ऑफिसचा नंबर मिळाल्यावर आयुषमान फार आनंदी होता. त्याने धर्मा प्रोडक्शनमध्ये फोन केला. त्यावेळी ऑफिसमधील एका व्यक्तीने करण तेथे नसल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याने फोन केला. त्यावेळी करण कामात व्यग्र असल्याचे सांगण्यात आले होते. नंतर त्याने पुन्हा फोन केला तेव्हा त्यांनी आम्ही फक्त स्टार किड्स सोबत काम करतो आणि तुमच्यासोबत करु शकत नाही असे म्हटले असल्याचे आयुषमानने आपल्या पुस्तकात लिहिलं आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर आयुषमानच्या पुस्तकातील हा किस्सा पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयुषमानने दिग्दर्शक सुरजित सरकर यांच्या ‘विकी डोनर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Ayushmann Khurrana, Bollywood, Karan Johar

    पुढील बातम्या