मलाइकाशी घटस्फोट घेतल्यावर अरबाज म्हणतो, 'मी काहीही करण्यासाठी तयार आहे.'

मलाइकाशी घटस्फोट घेतल्यावर अरबाज म्हणतो, 'मी काहीही करण्यासाठी तयार आहे.'

नुकताच एका कार्यक्रमात अरबाज मलाइकाशी घटस्फोट घेण्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर भावूक झालेला दिसला.

  • Share this:

मुंबई, 12 एप्रिल : अभिनेत्री मलाइका अरोरा सध्या अर्जुन कपूरशी असलेल्या रिलेशनशीपमुळे खूप चर्चेत आहे. मलाइका आणि अरबाज खान यांनी 2017मध्ये घटस्फोट घेतला. पण यावर जाहीरपणे बोलणं दोघांनीही वारंवार टाळलं. त्यामुळे मलाइका-अरबाजचा ब्रेकअप का झाला हा प्रश्न आजही त्यांच्या चाहत्यांच्या मनात उपस्थित होतो. नुकताच एका कार्यक्रमात अरबाज मलाइकाशी घटस्फोट घेण्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर भावूक झालेला दिसला. अरबाज त्याचा मुलगा अरहानबाबत बोलताना म्हणाला त्यानं आम्हाला दोघांना वेगळं होताना पाहिलं आहे.

काही दिवसांपूर्वी अरबाज दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या इंडियन ज्यूनिअर प्लेअर लीग T20च्या उद्धाटन सोहळ्याला उपस्थित राहिला होता. यावेळी बोलताना अरबाज म्हणाला, 'मी नेहमी माझ्या मुलाबद्दल जागरूक असतो. माझा मुलगा 14 वर्षांचा आहे. त्यानं आपल्या आई-वडिलांना वेगळं होताना पाहिलं आहे. यावेळी त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यासोबतच त्याला मला चांगले संस्कारही द्यायचे आहेत.' अरबाज पुढे म्हणाला, माझं आणि मलाइकाचं नातं खीप चांगलं आहे. तिच्या कुंटुंबीयांशीही माझे चांगले संबंध आहेत. माझ्या मुलासाठी वेळ देऊन मी सर्व गोष्टींचं नियोजन करतो. त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.

 

View this post on Instagram

 

Au revoir @niyamamaldives #iloveumaldives♥️

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

मीडिया रिपोर्टनुसार मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर एकमेकांना डेट करत आहेत. मात्र या दोघांनी अद्याप आपल्या नात्याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. पण या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. तर दुसरीकडे अरबाज खान मॉडेल जॉर्जिया सोबत रिलेशनशीपमध्ये असून हे दोघंही लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जातं आहे. तर मलाइका आणि अर्जुन या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत.

First published: April 13, 2019, 7:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading