मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /बिग बी ते गोविंदा... विपरीत परिस्थितीवर मात करुन या कलाकारांनी मिळवलं यश

बिग बी ते गोविंदा... विपरीत परिस्थितीवर मात करुन या कलाकारांनी मिळवलं यश

आर्थिक संकटातही न डगमगता पुढे जाणारे बिग बी, शाहरुख खान, गोविंदा 

आर्थिक संकटातही न डगमगता पुढे जाणारे बिग बी, शाहरुख खान, गोविंदा 

आर्थिक संकटातही न डगमगता पुढे जाणारे बिग बी, शाहरुख खान, गोविंदा 

मुंबई 4 मे: बॉलिवूडचे (Bollywood) स्टार्स, सुपरस्टार्स, त्यांना मिळणारी प्रसिद्धी, त्यांची श्रीमंती, अलिशान रहाणीमान पाहून अनेकांना त्यांचा खूप हेवा वाटत असतो. त्यांच्यासारखं आयुष्य जगायला मिळायला हवं असं वाटत असतं; पण त्यांनी केलेला संघर्ष, कष्ट अनेकांना माहित नसतात. आज सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी अविरत संघर्ष केला आहे. अगदी हॉटेलात भांडी घासण्यापासून ते रस्त्यावर झोपण्यापर्यंतचा अनुभव त्यांनी घेतला आहे. म्हणतात ना रावाचा रंक आणि रंकाचा राव होण्यास वेळ लागत नाही. बॉलिवूडमधील बिग बीसारख्या दिग्गज कलाकारांनी देखील नशीबाचा असा फेरा अनुभवला आहे. अत्यंत कठीण काळात धैर्यानं वागून कामाप्रती समर्पित भावना ठेवल्यानं हे दिग्गज या परिस्थितीवर मात करून पुन्हा यशाच्या शिखरावर विराजमान झाले आहेत. यामध्ये अमिताभ बच्चनपासून (Amitabh Bachchan) शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि गोविंदापर्यंतच्या (Govinda) अनेक सुपरस्टार्सचा समावेश आहे.

आपल्या अत्यंत अलिशान जीवनशैलीसाठी ओळखला जाणारा शाहरुख खान आपलं नशीब आजमावण्यासाठी पहिल्यांदा मुंबईला आला तेव्हा खायचे प्यायचेही वांदे होते. तो ओबेरॉय हॉटेलबाहेर फूटपाथवर झोपायचा. हॉटेलचे वॉशरूम्सदेखील त्यानं स्वच्छ केली आहेत. भाड्याचे पैसे थकल्यानं त्याला एकदा रस्त्यावर फेकण्यात आलं होतं. ‘मला अपयशाची भीती वाटते. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला असल्यानं मी अनेक अपयशं पाहिली आहेत, असं त्यानं एकदा म्हटलं होतं.

यामी गौतम अडकली विवाह बंधनात; कोणालाही न सांगता गुपचूप केलं लग्न

बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)यांनी चित्रपटसृष्टीत प्रचंड यश मिळवलं;पण व्यवसायात त्यांना जोरदार फटका खावा लागला. त्यांनी अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड (ABCL) ही इव्हेंट मॅनेजमेंट आणि प्रॉडक्शन कंपनी सुरू केली होती; पण त्यात त्यांना एवढा तोटा झाला की, तब्बल; 90 कोटी रुपयांचे कर्ज झालं. त्यासाठी त्यांना आपलं घरदेखील तारण ठेवावं लागलं होतं. कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी शो सुरू झाला आणि अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा धमाकेदार सुरुवात केली.

सौम्या टंडननं बनावट ओळखपत्राद्वारे केलं लसीकरण? व्हायरल होतंय Fake ID

नृत्य आणि विनोद या बळावर चित्रपटसृष्टी गाजवणारा अभिनेता गोविंदा (Govinda) याच्या एकेकाळी हातात एकही चित्रपट नव्हता, आणि डोक्यावर प्रचंड कर्ज होते. रिक्षाच्या भाड्याचे पैसे देण्यासाठी देखील त्याच्याकडे पैसे नसायचे, अशी वेळ त्याच्यावर आली होती. पण हिमतीनं आणि चिकाटीनं मेहनत करून या सर्वांनी या परिस्थितीवर मात केली म्हणूनच त्यांचं यश आजही अबाधित आहे.

First published:
top videos

    Tags: Amitabh Bachchan, Bollywood actor, Shah Rukh Khan