जखमी अवस्थेतही ऐश्वर्यानं डान्स न थांबवता पूर्ण केलं शूटिंग!

जखमी अवस्थेतही ऐश्वर्यानं डान्स न थांबवता पूर्ण केलं शूटिंग!

अनेकदा कलाकार दुखापत झालेली असतानाही शूटमध्ये अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वेदना सहन करत स्वतःला त्या सिनेमात झोकून देत काम करतात. असंच काहीस ऐश्वर्यासोबत घडलं होतं.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : संजय लीला भन्साळी यांचा ‘देवदास’ ऐतिहासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो. हा सिनेमा रिलीज होउन बरीच वर्षं झाली आहेत. या सिनमाची कास्ट तर तगडी होतीच पण सोबतच सिनेमाच्या भव्य सेट्स आणि सिनेमॅटोग्राफीवरून हे दिसून आलं की आपल्या सिनेमाला ग्रॅनड टच देताना भन्साळींनी कोणतीही कसर सोडली नाही. त्यामुळे सिनेमाचं शूट करताना फक्त दिग्दर्शक आणि सेटवरील इतर मेंबर्सनाच नाही तर कलाकारांनाही अनेक दिव्यं पार करावी लागली होती. हे शूट कलाकारांसाठी एक आव्हान होतं.

‘देवदास’मध्ये तब्बल 42 जनरेटर्स वापरण्यात आले होते. त्या काळात कोणत्याही सिनेमासाठी जास्तीत जास्त 2 किंवा 3 जनरेटर्सचा वापर होत असे. तसेच 2500 लाइट्सचा वापर या सिनेमात झाला होता. यासाठी 700 लाइट्समन आणि अनेक ज्यूनिअर आर्टिस्टनी या सेटवर रात्रंदिवस मेहनत घेतली होती. एवढंच नाही तर या सिनेमामुळे मुंबईतील लग्नांवरही परिणाम झाला होता. कारण जवळजवळ सर्वच जनरेटर्स या सिनेमाच्या सेटवर होते. त्यामुळे लग्नांसाठी जनरेटर्स मिळणं खूप कठीण झालं होतं.

खुल्लम खुल्ला प्यार करे! 'या' 5 कपल्सनी दिली नात्याची जाहीर कबुली

सिनेमातील चंद्रमुखीच्या कोठा बनवला होता त्या सेटची किंमत 12 कोटी होती. हा सेट एका कृत्रिम तलावाच्या बाजूला बनवला होता. यातील पाणी सतत कमी होत असे. त्यामुळे त्यात पुनपुन्हा पाणी ओतावं लागत असे. या सिनेमातील काही सेट्स हे राजस्थानच्या दिलवारा मंदिराच्या रचनेवरून तयार करण्यात आले होते. या सिनेमात चंद्रमुखीची भूमिका माधुरी दीक्षितनं साकारली होती. तिच्या भूमिकेसाठी लागणारे सर्व ड्रेस बॉलिवूड मधील प्रसिद्ध डिझायनर अबु जानी-संदीप खोसला यांनी तयार केले होते. यातील ‘डोला रे डोला’ या गाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ड्रेसचं वजन 30 किलो होतं. ज्यामुळे क्लासिकल डान्स करणं माधुरीला खूप कठिण जात होतं. शेवटी हा ड्रेस बदलण्यात आला आणि त्याऐवजी 16 किलो वजनाच्या ड्रेसवर माधुरीनं परफॉर्म केलं.

OMG! तीन खोल्यांएवढी मोठी आहे शाहरुखच्या व्हॅनिटी व्हॅनची बाथरुम

'डोला रे डोला' हे गाणं लिहिण्यासाठीच जवळपास 1 आठवड्याचा कालावधी लागला होता. या गाण्यावर ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित परफॉर्म करणार होत्या त्यामुळे भन्साळींना हे गाणं खूप स्पेशल असावं असं वाटत होतं. या गाण्यासाठी या दोघींनाही खूप वजनदार ज्वेलरी घालावी लागली होती. त्यामुळे कानातील वजनदार झुमक्यांमुळे ऐश्वर्याच्या कानांना जखमा झाल्या होत्या. ज्यामुळे तिच्या कानातून रक्त येऊ लागलं होतं मात्र शूट पूर्ण होईपर्यंत तिनं याबाबत कोणालाही सांगितलं नव्हतं. तशाच अवस्थेत ती डान्स करत राहिली आणि शूट पूर्ण केलं. या सिनेमाचं बजेट 50 कोटी होतं. 17 वर्षांपूर्वी ही खूप मोठी रक्कम होती आणि त्या काळातला हा सर्वात महागडा सिनेमा ठरला होता. ऐश्वर्या आणि माधुरी या दोघींच्या ड्रेसचा एकूण खर्चच 10 ते 15 लाख एवढा झाला होता. तर सेटसाठी जवळपास 20 कोटींचा खर्च आला होता.

फॅमिलीसाठी पुन्हा एकत्र आले अरबाज-मलायका, पाहा PHOTO

============================================================================

VIDEO: सराफाच्या दुकानात दरोडा, लाखो रुपयांचे दागिने केले लंपास

Published by: Megha Jethe
First published: November 11, 2019, 2:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading