मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /व्हॉट्सअ‍ॅप आता आणखी अ‍ॅडव्हान्स होणार, जवळच्या किराणा दुकानांचीही माहिती देणार

व्हॉट्सअ‍ॅप आता आणखी अ‍ॅडव्हान्स होणार, जवळच्या किराणा दुकानांचीही माहिती देणार

WhatsApp Mobile नंबरशी जोडलेले सर्व बँक अकाउंट्स लिस्टमध्ये दिसतील.

WhatsApp Mobile नंबरशी जोडलेले सर्व बँक अकाउंट्स लिस्टमध्ये दिसतील.

काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपने पेमेंट (WhatsApp Payments) सुविधा आणली होती. त्यानंतर आता व्हॉट्सअ‍ॅप आणखी एक फीचर आणणार असून, आता व्हॉट्सअ‍ॅपवरून हॉटेल बुकिंगसह रेशन ऑर्डर करता येणार आहे. '

    मुंबई, 27 डिसेंबर : जगभरात सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या तुलनेत व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सर्वाधिक लोकप्रिय आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे कोट्यवधी व्यक्ती एकमेकांशी जोडले गेले आहेत. फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत चॅट करण्यासाठी आणि ऑफिसच्या कामासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जातो. जवळपास प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप पाहायला मिळते. युझर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅपकडून वेळोवेळी व्हर्जन अपडेट केलं जातं आणि विविध फीचर्स लाँच केली जातात. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपने पेमेंट (WhatsApp Payments) सुविधा आणली होती. व्हॉट्सअ‍ॅप आणखी एक फीचर आणणार असून, आता व्हॉट्सअ‍ॅपवरून हॉटेल बुकिंगसह रेशन ऑर्डर करता येणार आहे. 'झी न्यूज'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

    व्हॉट्सअ‍ॅपने व्हॉट्सअ‍ॅप ट्रॅकर (WhatsApp tracker) हे फीचर लाँच केलं आहे. यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, किराणा आणि कपड्यांची दुकानं यांची माहिती मिळणार आहे. सध्या हे फीचर फक्त ब्राझीलमधल्या साओ पाउलो (Sao Paulo) शहरात लाँच केलं गेलं आहे. येत्या काही दिवसांत ते सगळीकडे लाँच करण्यात येणार आहे. हे फीचर लाँच झाल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये बिजनेस नियरबाय (Businesses Nearby) नावाचा सेक्शन पाहायला मिळेल. या सेक्शनवर क्लिक केल्यानंतर फिल्टरची सुविधा दिसेल. याद्वारे तुम्ही तुमच्या पसंतीनुसार हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सचं सिलेक्शन करू शकता. गुगल प्ले स्टोअरवर किराणा आणि हॉटेल बुकिंगची अनेक अ‍ॅप्स आहेत. व्हॉट्सअ‍ॅप या सर्व अ‍ॅप्सना जोरदार टक्कर देणार आहे.

    हेही वाचा : आता WhatsApp वरच समजेल तुमचा Bank Balance, पाहा सोपी प्रोसेस

    आयओएस 2.21.170.12 अपडेटसाठी व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन बीटा अपडेट जारी केलंय. त्यानंतर बिझनेसची माहिती देण्यासाठी एक पेजदेखील प्रसिद्ध केलं आहे. आयओएस आणि अँड्रॉइडसाठी व्हॉट्सअ‍ॅप बीटा भविष्यातल्या अपडेटमध्ये कॉन्टॅक्ट इन्फोसाठी असंच एक पेज तयार करण्याचा विचार करत आहे. बिझनेस इन्फोसाठी सादर करण्यात आलेल्या इंटरफेसचा उपयोग केला जाणार असून, कॉन्टॅक्ट इन्फो पेजवर सर्चचं शॉर्टकट फीचर देण्यात येणार आहे. त्यामध्ये ट्रॅकर असणार आहे.

    हेही वाचा : Best 5G Smartphones : 20 हजारांहून कमी किंमतीत घेता येतील हे फोन, पाहा काय आहेत फीचर्स

    याशिवाय, व्हॉट्सअ‍ॅपकडून Whatsapp Pay पर्यायाची जागादेखील बदलण्यात येणार आहे. सध्या Whatsapp Pay चा पर्याय ज्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी मीडिया फाईल्स अपलोड करण्यासाठीचा पर्याय असायचा. अनेकदा युझर्स फोटो अपलोड करण्यासाठी चुकून Whatsapp Pay पर्यायावर क्लिक करतात. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपकडून ती जागा बदलण्यात येणार आहे.

    First published:
    top videos