मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

तुम्ही पाहिलीय का रिंकू राजगुरूची बॅग? अभिनेत्री सोबत ठेवते 'या' वस्तू

तुम्ही पाहिलीय का रिंकू राजगुरूची बॅग? अभिनेत्री सोबत ठेवते 'या' वस्तू

चाहत्यांना कलाकरांबद्दल  (Film Stars)  जाणून घेण्याची फारच उत्सुकता असते. त्यांच्या चित्रपटांपासून ते त्यांच्या पर्सनल लाईफपर्यंत सर्व गोष्टींवर चाहत्यांचं लक्ष असतं.अनेकांना हा प्रश्न पडतो, की अभिनेत्री आपल्या पर्समध्ये किंवा बॅगेत नेमकं काय कॅरी करतात.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 19 नोव्हेंबर- चाहत्यांना कलाकरांबद्दल  (Film Stars)  जाणून घेण्याची फारच उत्सुकता असते. त्यांच्या चित्रपटांपासून ते त्यांच्या पर्सनल लाईफपर्यंत सर्व गोष्टींवर चाहत्यांचं लक्ष असतं.अनेकांना हा प्रश्न पडतो, की अभिनेत्री आपल्या पर्समध्ये किंवा बॅगेत नेमकं काय कॅरी करतात. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी असंच काहीसं खास घेऊन आलो आहोत. मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या  (Rinku Rajguru)  बॅगेत  (Bag)  काय असतं हे अभिनेत्रीने स्वतः शेअर केलं आहे. चला तर मग पाहूया हा व्हिडीओ.

काही महिन्यांपूर्वी राजश्री मराठीच्या युट्युब चॅनेलवर रिंकूचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. यामध्ये रिंकूने आपल्या बॅगेत कोणत्या गोष्टी असतात, याचा खुलासा केला होता. या व्हिडीओमध्ये रिंकूकडे एक काळ्या रंगाची बॅग दिसून आली. ती रिंकूला तिच्या आईने घेऊन दिली असल्याचं तिनं सांगितलं आहे. ही बॅग आपण नेहमीच आपल्या सोबत कॅरी करत असल्याचंही ती म्हणाली. रिंकूने आपल्याला बॅग घेऊन फिरण्याची सवय नसल्याचंही म्हटलं आहे. मात्र सध्या शुटिंग्स प्रोजेक्टसमुळे तिला ते घेऊन फिरणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे.

" isDesktop="true" id="632527" >

रिंकूच्या बॅगेत असतात 'या' वस्तू-

अभिनेत्री रिंकू राजगुरू फारच साधेपणाने राहणे पसंत करते. त्यामुळे तिच्या बॅगेतसुद्धा अतिशय सहज-साध्या वस्तू पाहायला मिळल्या. सर्वात महत्वाचं रिंकू आपल्या बॅगेत नेहमीच आपला कॅरी करते. त्यांनतर ती बॅगेत नेहमीच पाण्याची बॉटल ठेवते. त्यामुळे सतत शरीरात पाणी जात राहतं. तसेच रिंकू आपल्याजवळ कॉफी मगसुद्धा ठेवते. जेणेकरून छोट्या-छोट्या कप्समधून कॉफी घेतल्यास ती कपड्यावर किंवा कारमध्ये पडणार नाही. सोबतच रिंकू फेसवॊश, परफ्युम या गोष्टीही आवर्जून कॅरी करते. तसेच रिंकू कार्ड्स आणि पैसे ठेवण्यासाठी एक छोटासा पर्ससुद्धा बॅगेत ठेवते. तसेच पेन, रबर बँड या गोष्टीही ती सोबत ठेवते. प्रवासात गाणी ऐकण्यासाठी हेडफोनही तिच्या जवळ असतं. मजेशीर गोष्ट म्हणजे रिंकू आपल्या बॅगेत नेहमीच स्पून अर्थातच स्टीलचे चमचे ठेवते. तिला बाहेरील लाकडी किंवा इतर चमच्याने खाणं सोयीस्कर होत नाही त्यामुळे आपण हा पर्याय निवडल्याच ती सांगते.

(हे वाचा:'Indian Idol Marathi'च्या मंचावर घुमला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आवाज... )

तर या सर्व गोष्टी रिंकू राजगुरू आपल्या बॅगेत ठेवत असते. रिंकू राजगुरू मराठीतील एक उत्कृष्ट अभिनेत्री समजली जाते. तिने अल्पवधीतच आणि अत्यंत कमी वयात हे यश मिळवलं आहे. 'सैराट' या चित्रपटातून ती घराघरात पोहोचली होती. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा इतिहास घडवला आहे. हा एकमेव मराठी चित्रपट आहे, ज्याने १०० कोटींचा गल्ला जमवला होता. या पहिल्याच चित्रपटासाठी रिंकूला उत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. रिंकू फक्त मराठीसाठीच मर्यादित नाही राहिली, तर तिने तामिळमध्येही काम केलं आहे. सोबतच हिंदीमध्येसुद्धा ती सक्रिय आहे. तिची १०० ही वेबसिरीज खास चर्चेत आली होती.

First published:

Tags: Marathi entertainment, Rinku rajguru