मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Pooja Sawant काय स्पेशल काम करतेय?; व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही पडला प्रश्न

Pooja Sawant काय स्पेशल काम करतेय?; व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही पडला प्रश्न

pooja sawant

pooja sawant

पूजा सावंत सध्या तिच्या आगामी 'दगदी चाळ 2' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच पूजाचा एक नवा व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये ती काहीतरी स्पेशल काम करत असल्याचं समजतंय.

  • Published by:  Sayali Zarad
मुंबई, 19 ऑगस्ट : मराठी सिनेसृष्टीतील 'कलरफुल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत (Pooja sawant). पुजानं एकापेक्षा एक जबरदस्त सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.पूजा सध्या तिच्या आगामी 'दगदी चाळ 2' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. अशातच पूजाचा एक नवा व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये ती काहीतरी स्पेशल काम करत असल्याचं समजतंय. तिच्या या व्हिडीनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. पूजा सावंतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये ती लॅपटॉपवर काहीतरी महत्त्वाचं काम करत असल्याचं दिसत आहे. राजश्री मराठीच्या ऑफिसमध्ये पूजा काय स्पेशल काम करतेय असा प्रश्न सध्या तिच्या चाहत्यांना पडला आहे. ती काय काम करतेय हे लवकरच तिच्या सोशल मीडियाच्या माध्यामातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. मात्र तिच्या या व्हिडीओनं सध्या सगळ्यांचीच उत्सुकता वाढवली आहे. पूजाचा हा व्हिडीओ राजश्री मराठीच्या अधिकृत अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
'दगडी चाळ 2' बद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट 2015 मध्ये आलेल्या दगडी चाळ या चित्रपटाचा सिक्वेल आहे.  या चित्रपटात पूजा सावंतसोबत अंकुश चौधरी आणि मकरंद देशपांडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 'दगडी चाळ 2' चित्रपट 18 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी अंकुश आणि पूजा दोघांचेही खूप उत्साहित आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचं प्रेम मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हेही वाचा -  मृण्मयीनं गौतमीला दिलं इतकं महागडं गिफ्ट; आता अभिनेत्रीवर आली नवं काम शोधण्याची वेळ दरम्यान, पुजा सावंत लवकरच अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबतही दिसणार आहे. पूजा आणि सिद्धार्थच्या या आगामी चित्रपटाचं नाव 'काँग्रॅच्युलेशन्स' असं आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबलदेखील दिसणार आहेत. प्रसिद्ध मराठमोळे दिग्दर्शक लोकेश विजय गुप्ते यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
First published:

Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Upcoming movie

पुढील बातम्या