शाहरुखनं सांगितलं ‘मन्नत’च्या एका रुमचं भाडं, किंमत ऐकून बसेल धक्का!

शाहरुखनं सांगितलं ‘मन्नत’च्या एका रुमचं भाडं, किंमत ऐकून बसेल धक्का!

शाहरुखच्या चाहत्यामध्ये त्याचा जुहूमधील बंगला ‘मन्नत’चं खास आकर्षण आहे.

  • Share this:

मुंबई, 22 जानेवारी : अभिनेता शाहरुख खान सध्या बॉलिवूडपासून दूर आहे मात्र तरीही तो काही ना काही कारणानं सोशल मीडियावर चर्चेत असतो. तो मागच्या वर्षभरात कोणत्याही सिनेमात दिसला नसला तरीही त्याच्या चाहत्यांचं त्याच्यावरील प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. त्याच्या चाहत्यामध्ये त्याचा जुहूमधील बंगला ‘मन्नत’चं खास आकर्षण आहे. शाहरुखप्रमाणं त्याचा हा बंगाला सुद्धा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेचा विषय ठरतो. आताही असंच काहीसं झालं आहे. शाहरुखला त्याच्या एका चाहत्यानं मन्नतमधील एका रुमचं भाडं विचारलं. त्यावर शाहरुखनं जे उत्तर दिलं ते ऐकून तुम्हाला धक्का बसू शकतो.

शाहरुखनं #AskSRK हा हॅशटॅग वापरत त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याच्या एका चाहत्यानं ट्विटरवर त्याला मन्नतच्या एका रुमचं भाडं किती आहे असा प्रश्न केला आणि विशेष म्हणजे शाहरुखनं त्याच्या या ट्वीटला उत्तरही दिलं आहे. त्यानं लिहिलं, ‘30 वर्षांची मेहनत.’ अर्थात शाहरुखचा हा बंगला कोणत्याही महालापेक्षा कमी नाही. पण त्यासाठी शाहरुखनं खूप मेहनतही घेतली आहे. शाहरुखचं हे घर जवळपास २०० कोटी रुपयांचं आहे.

महाराष्ट्रात 'तान्हाजी' सिनेमा टॅक्स फ्री, बॉक्सऑफिसवर कमाईची घोडदौड सुरुच

या बंगल्याबद्दल आणखी एक रंजक किस्सा आहे. तो म्हणजे शाहरुखच्या आधी हा बंगला सलमान खान विकत घेणार होता मात्र त्यानं तसं केलं नाही. या गोष्टीचा खुलासा सलमाननं एका मुलाखतीत केला होता आणि त्यासोबत त्याचं कारणही दिलं होतं. सलमान म्हणाला, जर माझ्या बाबांनी सलीम खान यांनी मला एवढ्या मोठ्या घरात तू करणार काय? हा प्रश्न विचारला नसता तर मी हे घर नक्कीच घेतलं असतं. सलमानने आपल्या वडिलांचं ऐकलं आणि त्याने तो बंगला न घेण्याचा निर्णय घेतला. ५३ वर्षीय सलमान म्हणाला की, ‘मलाही शाहरुखला हाच प्रश्न विचारायचा आहे की, एवढ्या मोठ्या घरात तो करतो तरी काय?’

पतीसोबत रोमान्स करताना भारती सिंहने बनवला tik tok व्हिडिओ, पण तितक्या...

शाहरुखने एका रेडिओ शोमध्ये मन्नतबद्दल बोलताना म्हटलं की, ‘मी दिल्लीचा आहे आणि दिल्लीच्या लोकांना मोठ्या घरात राहण्याची सवय असते. तर मुंबईत अपार्टमेन्टमध्ये राहण्याची कन्सेप्ट आहे.’ शाहरुख पुढे म्हणाला की, ‘दिल्लीत कोणी श्रीमंत जरी नसला तरी तो छोटासा बंगला घेण्याचा प्रयत्न करतो.’

शाहरुख पुढे म्हणाला, ‘जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हा मी छोट्या अपार्टमेन्टमध्ये पत्नी गौरीसोबत राहत होतो. माझी सासू नेहमी मला म्हणायची की तुम्ही एवढ्या लहान घरात कसं काय राहता. जेव्हा मी मन्नत पाहिला तेव्हा माझ्या मनात पहिली गोष्ट कोणती आली असेल तर ती ही होती की दिल्लीसारखं घर.’

आधी ‘तान्हाजी’ सिनेमाला म्हटलं ‘वाहियात’, आता अभिनेत्याचा ट्विटरवरुन माफीनामा

किंग खान सांगितलं की, त्याने मन्नत पाहिल्यावरच तो विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. तसंच आतापर्यंतच शाहरुखचं सर्वात महागड्या पॅशनपैकी मन्नत विकत घेणं हेच आहे.

First published: January 22, 2020, 5:54 PM IST

ताज्या बातम्या