सलमान-आलियाच्या ‘इन्शाअल्लाह’चं काय आहे हॉलिवूड कनेक्शन

सलमान-आलियाच्या ‘इन्शाअल्लाह’चं काय आहे हॉलिवूड कनेक्शन

बॉलिवूडचे अनेक सिनेमा हे मूळ साउथ किंवा हॉलिवूड सिनेमांवर आधारित असतात. वाचा काय आहे सलमानच्या ‘इन्शाअल्लाह’चं हॉलिवूड कनेक्शन.

  • Share this:

मुंबई, 24 ऑगस्ट : बॉलिवूडचे अनेक सिनेमा हे मूळ साउथ किंवा हॉलिवूड सिनेमांवर आधारित असतात. ‘चोर मचाए शोर’, ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’, ‘जुडवा’, ‘बाजीगर’ अशा अनेक सिनेमांचा यात समावेश होतो. अशातच आता संजय लीला भन्साळींचा आगामी सिनेमा ‘इन्शाअल्लाह’ एका हॉलिवूड सिनेमापासून प्रेरित होऊन तयार करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. ‘इन्शाअल्लाह’ या सिनेमाच्या माध्यमातून सलमान खान आणि संजय लीला भन्साळी तब्बल 20 वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. यात आलिया भट सलमानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

सलमान खान त्याचा आगामी सिनेमा ‘दबंग 3’चं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर ‘इन्शाअल्लाह’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्यासाठी त्याची तयारीही सुरू आहे. सलमाननं त्यासाठी वजनही कमी केलं आहे. अशातच आता हा सिनेमा बॉलिवूड सिनेमा 1990 मध्ये रिलीज झालेल्या मूळ हॉलिवूड सिनेमा प्रीटी वूमेन (Pretty Women) वर प्रेरित असल्याचं बोललं जात आहे. या सिनेमात रिचर्ड गेरे आणि ज्यूलिया रॉबर्ट यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा हॉलिवूडमधील ऑल टाइम बेस्ट रोमँटिक सिनेमा म्हणून ओळखला जातो.

VIDEO : अभिनेत्रीला जेवणात सापडले जिवंत किडे, 5 स्टार हॉटेलची पोलखोल

प्रीटी वूमेन हा हॉलिववूडमधील लोकप्रिय सिनेमा ठरला होता. या सिनेमात ज्यूलियानं एका तरुण वेश्येची भूमिका साकारली होती ती नंतर एका श्रीमंत बिझनेसमनच्या प्रेमात पडते. तर भन्साळी यांच्या सिनेमातही आलिया भट एक छोट्या मोठ्या अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे. सलमान खान तिला डेटसाठी बोलवतो आणि मग तो तिच्या प्रेमात पडतो.

'या' अभिनेत्रीनं विकी कौशलचा प्रेमात केला घात, VIDEO VIRAL

संजय लीला भन्साळी यांच्या ‘इन्शाअल्लाह’चं शूटिंग अमेरिकेत केलं जाणार आहे. सध्या सलमान ‘दबंग 3’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यानंतर तो ‘इन्शाअल्लाह’चं शूट सुरू करणार आहे. या सिनेमात लव्ह ट्रँगल पाहायला मिळणार असल्याचं बोललं जात आहे. डेक्कन क्रॉनिकलनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आलिया भट व्यतिरिक्त या सिनेमात आणखी एक अभिनेत्री पाहायला मिळू शकते. भन्साळींच्या जवळपास सर्वच सिनेमांमध्ये प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळाला आहे. यात एक तर दोन अभिनेत्री आणि एक अभिनेता असतो किंवा मग दोन अभिनेते आणि एक अभिनेत्री असते. सलमान या सिनेमात 40 वर्षीय व्यक्तीच्या तर आलिया 25 वर्षीय मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.

KBC : PUB-G चा फुलफॉर्म विचारताच स्पर्धकानं वापरली लाइफलाइन

======================================================================

VIDEO: गोविंदा आला रे आला! 'विजेता' सिनेमाच्या सेट सेलिब्रिटींनी फोडली हंडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2019 04:44 PM IST

ताज्या बातम्या