संजय दत्तच्या 'कलंक'मध्ये काय आहे माधुरीची भूमिका?

संजय दत्तच्या 'कलंक'मध्ये काय आहे माधुरीची भूमिका?

कलंकमध्ये माधुरी वेश्येच्या भूमिकेत आहे. शिवाय ती कथ्थक नृत्यांगनाही आहे.

  • Share this:

22 मे : माधुरी दीक्षित आणि संजय दत्तचा सिनेमा कलंकबद्दल खूप उत्सुकता आहे. अर्थात, माधुरी कुठल्या भूमिकेत असेल याबद्दलही तर्कवितर्क लढवले जात होतेच. पण आता माधुरीच्या भूमिकेबद्दल कळलंय. कलंकमध्ये माधुरी वेश्येच्या भूमिकेत आहे. शिवाय ती कथ्थक नृत्यांगनाही आहे.

देवदासमध्ये माधुरी दीक्षितनं वेश्या साकारली होती. त्यानंतर आता पुन्हा ती अशाच भूमिकेत दिसणार आहे. कलंक हा पीरियड ड्रामा आहे. त्यात संजय दत्त राजाच्या भूमिकेत असेल.

माधुरी आणि संजय दत्त २५ वर्षांनी सिनेमात एकत्र काम करतायत. याशिवाय सिनेमात वरुण धवन, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर यांच्याही भूमिका आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2018 04:34 PM IST

ताज्या बातम्या