• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • शाहरुख खानचं खरं नाव काय? SRK ला आजी या नावानं मारायची हाक

शाहरुख खानचं खरं नाव काय? SRK ला आजी या नावानं मारायची हाक

शाहरुखच्या वडिलांनी त्याचं नाव बदललं. या मागे देखील एक रंजक किस्सा आहे. जो स्वत: शाहरुखनं चाहत्यांसोबत शेअर केला.

 • Share this:
  मुंबई 27 जून: शाहरुख खान (Shahrukh Khan) हा बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. आपल्या अनोख्या स्टाईलनं प्रेक्षकांना चकित करणाऱ्या शाहरुखला काही जण बॉलिवूडचा बादशाह देखील म्हणतात. परंतु SRK, बादशाह या व्यतिरिक्त त्याचं आणखी एक नाव आहे, अब्दुल रेहमान. हे नाव त्याच्या आजीनं ठेवलं होतं. आजी त्याला याच नावानं हाक मारायची. परंतु नंतर शाहरुखच्या वडिलांनी त्याचं नाव बदललं. या मागे देखील एक रंजक किस्सा आहे. जो स्वत: शाहरुखनं चाहत्यांसोबत शेअर केला. शाहरुखनं अनुपम खेर यांना दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्यानं अब्दुल रेहमान या नावाचा किस्सा सांगितला. त्याच्या आजीला हे नाव खूप आवडलं होतं. अन् आपल्या नातवाला याच नावानं ओळखलं जावं अशी तिची इच्छा होती. परंतु नंतर शाहरुखच्या वडिलांनी नाव बदललं. शाहरुख या शब्दाचा अर्थ राजकुमार सारखा सुंदर दिसणारा व्यक्ती असा होतो. परंतु शाहरुखचे भावंड त्याला त्याच्या जुन्या नावावरुन चिडवायचे. ‘अब्दुर रहमान की मै अब्दुर रहमानिया’ हे गाणं गाऊन त्याची खिल्ली उडवायचे. मिस इंडियाचा बिकिनी अवतार; रूही समुद्रकिनारी घेतेय सुट्टीचा आनंद मराठीच नाही तर हिंदीतही ठरतेय लोकप्रिय; पाहा मराठमोळ्या सुखदाचं निखळ सौंदर्य शाहरुखला अब्दुल रेहमान या नावापेक्षा त्याचं आत्ताचं नावच जास्त आवडतं. कारण याच नावानं त्याला जग ओळखतं. शिवाय अब्दुल हे नाव त्याच्या व्यक्तिमत्वाला शोभलं नसतं असंही त्याला वाटतं. मुलाखतीत जेव्हा अनुपम खेर यांनी अब्दुल रेहमान हे नाव घेतलं तेव्हा शाहरुख थोडा आश्चर्यचकित झाला होता. कारण त्याचं हे नाव फारच कमी लोकांना माहित आहे. पण या नावाच्या निमित्तानं त्यानं आपल्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या.
  Published by:Mandar Gurav
  First published: